संगणक परिचालकाचे मानधन थकले

By Admin | Updated: July 2, 2015 23:47 IST2015-07-02T23:47:29+5:302015-07-02T23:47:29+5:30

संगणक परिचालकाचे

Computer operators' monetary tiredness | संगणक परिचालकाचे मानधन थकले

संगणक परिचालकाचे मानधन थकले

गणक परिचालकाचे
मानधन थकले
वेरुळ : संग्राम प्रकल्पांतर्गत काम करणार्‍या संगणक परिचालकाचे फेब्रुवारीपासूनचे मानधन थकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या परिचालकांनी येथे बैठक घेऊन मानधन त्वरित देण्याची मागणी केली.
ई पंचायत उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र शासन व टाटा कंस्लटन्सी सर्विसेस यांची भागिदारी असलेल्या महा ऑनलाईन कंपनी स्थापन करण्यात आली असून प्रत्येक ग्रामपंचायतकडे संगणक देऊन संगणक परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांचे वेतन शासन निर्णयानुसार ८००० रुपये असताना मात्र ४५०० रुपयेच दिल्या जाते. बाकी उर्वरित रक्कम स्टेशनरी खर्चाच्या नावाखाली कपात करण्यात येत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वाकळे, उपाध्यक्ष राजेश आढे यांनी सांगितले.
एकीकडे शासन डिजीटल इंडियाची घोषणा करते आणि दुसरीकडे ई-गव्हर्नरचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर अन्याय सुरू असून वेळोवेळी आंदोलन करूनही आजपर्यंत दखल घेण्यात आली नाही. तरी वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन संगणक परिचालकांचे थकलेले मानधन त्वरित देण्याची मागणी या बैठकीत केली आहे. या बैठकीस संघटनेचे प्रकाश वाकळे, राजेश आढे, सचिव विशाल जाधव, भगवान आधाने, दीपक मालोदे, संदीप डांबरे, गणेश नलावडे, सुभाष बोंबले, जगदीश देहाडे, सुभाष मगर, ज्ञानेश्वर दांडेकर, बाळासाहेब नवपुते, काकासाहेब बारगळ, संदीप बोडखे, काकासाहेब वाकळेसह आदी संगणक परिचालक उपस्थित होते.

Web Title: Computer operators' monetary tiredness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.