कॉम्प्युटर इन्स्टट्यिूट बंद करून संचालिका फरार

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:22+5:302015-02-13T00:38:22+5:30

विद्यार्थ्यांची फसवणूक : गुन्हा दाखल

Computer operators abducted by shutting down the computer institute | कॉम्प्युटर इन्स्टट्यिूट बंद करून संचालिका फरार

कॉम्प्युटर इन्स्टट्यिूट बंद करून संचालिका फरार

द्यार्थ्यांची फसवणूक : गुन्हा दाखल
नागपूर : विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये गोळा केल्यानंतर कॉम्प्युटर इन्स्टट्यिूट बंद करून संचालिकेने पळ काढला. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी सदर पोलिसांनी अनुप्रिया विक्रांत गजभिये (वय ३३, रा. नरेंद्रनगर) या महिलेवर बुधवारी गुन्हा दाखल केला.
गजभिये हिने डिसेंबर २०१२ मध्ये सदरमध्ये (बजाज विंग, ब्लॉक नं. ४,५) इन्स्टट्यिूट ऑफ ॲडव्हान्स, नेटवर्क टेक्नॉलॉजी नावाने संस्था सुरू केली. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासोबतच ती रोजगाराचे स्वप्न दाखवत होती. गजभिये हिने अनेक विद्यार्थ्यांकडून कॉम्प्युटर कोर्स फी च्या नावाखाली वेगवेगळ्या कोर्ससाठी हजारो रुपये गोळा केले. नमूद कालावधीचा कोर्स पूर्ण न करताच तिने संस्थेला टाळे लावून पलायन केले. या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली. तेजस लिओ जॉन (वय २१, रा. पंजाबी लाईन कामठी रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गजभिये हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तिचा शोध घेतला जात आहे.
----

Web Title: Computer operators abducted by shutting down the computer institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.