बोरा इंग्लिश स्कूलमध्ये विविध कार्यक्रम संपन्न
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:36+5:302014-12-20T22:27:36+5:30
वणी : येथील किसनलाल बोरा इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये नाताळ सणाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.

बोरा इंग्लिश स्कूलमध्ये विविध कार्यक्रम संपन्न
व ी : येथील किसनलाल बोरा इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये नाताळ सणाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाचा प्रारंभ किसनलाल बोरा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून एकता व अखंडतेचा संदेश विविध कार्यक्रमातून दिला. तसेच एकांकिका, नाट्यछटा, गीतनृत्य द्वारे बालगोपाळांनी नाताळ उत्सवात रंगत आणली. महेंद्र बोरा, अलकेश खाबिया, मनोज बोथरा, नामदेव घडवजे, प्राचार्य, शिक्षक, पालक, विद्यार्थीवर्ग उपस्थित होते. (वार्ताहर)