मेहुणीविरोधात खंडणी आणि फसवणुकीची आपटेंची तक्रार

By Admin | Updated: July 19, 2015 21:22 IST2015-07-19T21:22:39+5:302015-07-19T21:22:39+5:30

ठाणे : अवघ्या सहा महिन्यांतच पत्नी अमृता किरकोळ भांडणामुळे माहेरी गेल्यानंतर तिच्यासह कापडिया कुटुंबच बेपत्ता असल्याची तक्रार सतीश आपटे यांनी नोंदविली होती. आता त्यांची मेहुणी मोनिका हिच्याविरुद्ध त्यांनी खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

Complaint of ransom and cheating incidents against sister-in-law | मेहुणीविरोधात खंडणी आणि फसवणुकीची आपटेंची तक्रार

मेहुणीविरोधात खंडणी आणि फसवणुकीची आपटेंची तक्रार

णे : अवघ्या सहा महिन्यांतच पत्नी अमृता किरकोळ भांडणामुळे माहेरी गेल्यानंतर तिच्यासह कापडिया कुटुंबच बेपत्ता असल्याची तक्रार सतीश आपटे यांनी नोंदविली होती. आता त्यांची मेहुणी मोनिका हिच्याविरुद्ध त्यांनी खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
अमृता यांच्या बेपत्ता होण्यामागे मोनिका कापडियावर आधी आपटेंनी संशय व्यक्त केला होता. त्यात अमृताचे दुसरे लग्न लावण्याचा कापडिया कुटुंबाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांचे आधी मोनिकाशी लग्न होणार होते. नंतर ते रद्द झाले. आता तिची लहान बहीण अमृताशी त्यांचे लग्न झाल्यानंतर २००३ मध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या एका तक्रारीवरून तिने त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. तसेच अमृताला घटस्फोट दे, अन्यथा मला पैसे दे, अशी मागणी मोनिकाने त्यांच्याकडे केली आहे. दरम्यान, ५ ऑक्टोबर २०१४ रोजी लिसा अर्थात अमृता आणि सतीश यांचा साखरपुडा झाल्यानंतर ८ डिसेंबर २०१४ रोजी मोनिकाने आपटे यांच्या घरातून चार लाखांचे १५ तोळे सोने चोरले. हा प्रकार ९ डिसेंबरला उघड झाला. मात्र, जून २०१५ मध्ये हे दागिने परत करू, असे कापडिया कुटुंबीयांनी आपटेंना लेखी दिले. मधल्या काळात म्हणजे १ जानेवारी २०१५ रोजी या दाम्पत्याचे लग्न झाले. त्यात कापडिया यांचे संपूर्ण कुटुंबच आपटेंकडे वास्तव्य करू लागले. नंतर, सासूशी झालेल्या किरकोळ वादातून अमृता घरातून निघून गेली. आता आपटेंना दागिनेही मिळाले नाहीत. शिवाय, पैशांसाठी धमकी, या सर्व प्रकारावरून त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात १७ जुलै रोजी मोनिकाविरुद्ध खंडणी, धमकी देणे आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन सुरवसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
.......................
प्रतितिधी - जितेंद्र कालेकर
.......................................
वाचली - नारायण जाधव

Web Title: Complaint of ransom and cheating incidents against sister-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.