समाधान शिबिराच्या दिवशीही स्वीकारणार तक्रारी अर्ज
By Admin | Updated: July 31, 2015 23:54 IST2015-07-31T23:54:42+5:302015-07-31T23:54:42+5:30
समाधान शिबिराच्या दिवशीही तक्रारी अर्ज स्वीकारणार

समाधान शिबिराच्या दिवशीही स्वीकारणार तक्रारी अर्ज
स ाधान शिबिराच्या दिवशीही तक्रारी अर्ज स्वीकारणार नागपूर : दक्षिण विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी ९ ऑगस्ट रोजी समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी नागरिकांकडून देण्यात येणारे तक्रार अर्ज त्या दिवशी सुद्धा स्वीकारले जातील, असे मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी आशा पठाण यांनी सांगितले. हैदराबाद हाऊस येथे शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात समाधान शिबिर होणार असून यावेळी प्रत्येक विभागाची माहिती देणारी दालने ठेवण्यात येणार आहे. २० जुलैपर्यंत प्राप्त झालेल्या तक्रार अर्जांना टोकन देण्यात आलेले आहेत. ऑनलाईन अर्ज केलेल्यांना टोकन देण्यासाठी दोन चौकशी कक्ष उभारण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.