राष्ट्रपती भवनची ललित मोदींविरुद्ध तक्रार

By Admin | Updated: July 6, 2015 03:48 IST2015-07-06T03:48:30+5:302015-07-06T03:48:30+5:30

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सचिव ओमिता पॉल यांच्याविरुद्ध अवमानजनक टिष्ट्वट केल्याबद्दल राष्ट्रपती भवनने रविवारी ललित मोदी यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली.

Complaint against Rashtrapati Bhavan's Lalit Modi | राष्ट्रपती भवनची ललित मोदींविरुद्ध तक्रार

राष्ट्रपती भवनची ललित मोदींविरुद्ध तक्रार

नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सचिव ओमिता पॉल यांच्याविरुद्ध अवमानजनक टिष्ट्वट केल्याबद्दल राष्ट्रपती भवनने रविवारी ललित मोदी यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली. सक्तवसुली संचालनालयातर्फे ललित मोदींची चौकशी सुरू आहे.
मोदींविरुद्धची ही तक्रार आल्यानंतर ललित मोदींचे टिष्ट्वटर पेज ब्लॉक करण्यासाठी न्यायालयाकडून आवश्यक निर्देश प्राप्त करायचे की गुन्हा दाखल करायचा, याबाबत दिल्ली पोसिलांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. राष्ट्रपती भवनने ललित मोदींनी गेल्या महिन्यात पोस्ट केलेल्या टिष्ट्वटसह एक तक्रार पोलिसांकडे पाठविली.

Web Title: Complaint against Rashtrapati Bhavan's Lalit Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.