अभिनेत्री सनी लिओन विरोधात मंचर पोलिसांत तक्रार

By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:19+5:302015-05-18T01:16:19+5:30

मंचर : चित्रपट अभिनेत्री सनी लिओन हिच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आले आहे. शिवसेना व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने हा अर्ज देण्यात आला आहे.

Complaint against Mancher police against actress Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओन विरोधात मंचर पोलिसांत तक्रार

अभिनेत्री सनी लिओन विरोधात मंचर पोलिसांत तक्रार

चर : चित्रपट अभिनेत्री सनी लिओन हिच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आले आहे. शिवसेना व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने हा अर्ज देण्यात आला आहे.
अभिनेत्री सनी लिओन ही बॉलीवूडमधील चित्रपटांत काम करते. हिंदू जनजागृती समितीने अश्लीलताविरोधी अभियान चालू केले आहे. -----???--- या संकेतस्थळावर लिओन हिची अश्लील छायाचित्रे असल्याचा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अविनाश रहाणे, हिंदू जनजागृती समितीचे दिलीप शेटे, माजी शहरप्रमुख कल्पेश अप्पा बाणखेले यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्याकडे तक्रार अर्ज दिला.
यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र करंजखोले, राजाराम बाणखेले, अरुण गिरे, संतोष बाणखेले, वसंतराव बाणखेले, ग्राहक संरक्षक कक्षाचे तालुकाप्रमुख बाळासाहेब शिंदे, संतोष गावडे, वैभव थोरात विशाल टाव्हरे आदी उपस्थित होते.
फोटो - अभिनेत्री सनी लिओन हिच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात तक्रारअर्ज देण्यात आला.

Web Title: Complaint against Mancher police against actress Sunny Leone