जमावाने मारहाण केल्याची तक्रार

By Admin | Updated: March 29, 2016 00:25 IST2016-03-29T00:25:42+5:302016-03-29T00:25:42+5:30

जळगाव- जमावाने शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केल्याची तक्रार रिजवानाबी शेख युसूफ शहा (रा.ख्वाजानगर, हुडको-पिंप्राळा) यांनी केली आहे. ख्वाजानगरातील काही स्थानिक नागरिकांनी वाईट हेतूने रिजवानाबी शेख यांना मारहाण करीत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या घरातून सोने-चांदीचे दागिने चोरून नेले, असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीचे निवेदन त्यांनी पोलिसांना दिले आहे.

Complaint about the mob assault | जमावाने मारहाण केल्याची तक्रार

जमावाने मारहाण केल्याची तक्रार

गाव- जमावाने शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केल्याची तक्रार रिजवानाबी शेख युसूफ शहा (रा.ख्वाजानगर, हुडको-पिंप्राळा) यांनी केली आहे. ख्वाजानगरातील काही स्थानिक नागरिकांनी वाईट हेतूने रिजवानाबी शेख यांना मारहाण करीत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या घरातून सोने-चांदीचे दागिने चोरून नेले, असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीचे निवेदन त्यांनी पोलिसांना दिले आहे.
मारहाण प्रकरणातील महिलांना अटक
जळगाव- क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एकास विळ्याने मारून गंभीर दुखापत केल्याप्रकरणातील संशयित आरोपी रेणुकाबाई रवींद्र लोहार, ललिताबाई गजानन मराठे व हिराबाई रतन कुंढरे (सर्व रा.लोणजे, ता.चाळीसगाव) यांना सोमवारी औद्योगिक वसाहत पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी रवींद्र लोहार (रा.नवीन कुसुंबा, ता.जळगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. तपास पोलीस नाइक संजय भोई करीत आहेत.

Web Title: Complaint about the mob assault