‘सद्भावना दिन’निमित्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा

By Admin | Updated: August 11, 2015 23:16 IST2015-08-11T23:16:06+5:302015-08-11T23:16:06+5:30

पणजी : स्व. राजीव गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 20 ऑगस्ट रोजी ‘सद्भावना दिन’ साजरा केला जातो. यानिमित्त गोवा प्रदेश महिला काँग्रेस आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रदेश काँग्रेस समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी पावरपॉईंट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Competition for students on 'Goodwill Day' | ‘सद्भावना दिन’निमित्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा

‘सद्भावना दिन’निमित्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा

जी : स्व. राजीव गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 20 ऑगस्ट रोजी ‘सद्भावना दिन’ साजरा केला जातो. यानिमित्त गोवा प्रदेश महिला काँग्रेस आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रदेश काँग्रेस समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी पावरपॉईंट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
अखिल गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा विषय ‘राजीव गांधी-भारतासाठीचा दृष्टिकोन’ असा आहे. स्पर्धा दोन विभागांत घेण्यात येणार आहे. माध्यमिक विभागात आठवी, नववी व दहावीचे विद्यर्थी तसेच उच्च माध्यमिक विभागात अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होत येईल. पॉवरपॉईंट सादरीकरणात जास्तीत जास्त 10 स्लाईड वापरता येतील. सादरीकरणात कोणताही व्हिडिओ असू नये. तसेच सादरीकरणाची भाषा इंग्रजी असावी, अशा अटी आहेत. पॉवरपॉईंट सादरीकरण 18 ऑगस्टपर्यंत ईमेल करावित, असे महिला काँग्रेसच्या सुनीता वेरेकर यांनी सांगितले.
स्पर्धेसाठी येणार्‍या प्रवेशिकांतून दोन्ही गटांत उत्कृष्ट पाच स्पर्धक निवडण्यात येतील. या स्पर्धकांना आपले पॉवरपॉईंट सादरीकरण 20 ऑगस्ट रोजी सद्भावना दिनी शिवाजी मेमोरियल हॉल-साखळी येथे सादर करावे लागेल. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे तीन, अडीच व दोन हजारांचे रोख बक्षीस व ट्रॉफी देण्यात येईल. तसेच इतर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल, असे आयटी प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश केरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Competition for students on 'Goodwill Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.