शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

लस बाजारात विकण्याची कंपन्यांची इच्छा; निर्यात करण्यासही परवानगी मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 06:54 IST

नियामकांनी मान्यता दिलेली लस निर्मात्यांकडून थेट विकत घेण्यासाठी मुभा द्यावी, असे पत्र अनेक राज्ये, संस्था आणि खासगी कंपन्यांनी सरकारला लिहिले आहे. लस उपलब्ध झाली तर ती जनतेला विनामूल्य देण्याची अनेक राज्यांची इच्छा आहे.

हरीश गुप्ता -नवी दिल्ली : कोरोनावरील लस राज्य सरकारे, कंपन्या आणि खुल्या बाजारात विकण्याच्या निर्मात्या कंपन्यांच्या विनंतीचा केंद्र सरकार विचार करू शकेल. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबादेतील भारत बायोटेक लिमिटेड (बीबीएल) या लस निर्मात्यांना या लशीची भारतातील गरज भागवल्यानंतर इतर देशांना निर्यात करण्यासही सरकार परवानगी देऊ शकेल. नियामकांनी मान्यता दिलेली लस निर्मात्यांकडून थेट विकत घेण्यासाठी मुभा द्यावी, असे पत्र अनेक राज्ये, संस्था आणि खासगी कंपन्यांनी सरकारला लिहिले आहे. लस उपलब्ध झाली तर ती जनतेला विनामूल्य देण्याची अनेक राज्यांची इच्छा आहे.उच्च पातळीवरील सूत्रांनी म्हटले की, भारतात सध्या लसीकरण ज्या गतीने सुरू आहे ते पाहता येत्या  मे-जूनपर्यंत लसीच्या ७०-८० दशलक्ष मात्रांची (डोसेस) गरज  भासेल. आघाडीवरील तीन कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा पहिला टप्पा मार्चअखेर, एप्रिलच्या मध्यात बहुधा पूर्ण होईल. लसीकरणाचा दुसरा टप्पा हा ५० वर्षांवरील लोकांसाठी त्यानंतर सुरू होईल.केंद्र सरकारने आतापर्यंत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लसीचे १६.६० दशलक्ष डोसेस विकत घेतले आहेत. त्यात सीरमचे ११ दशलक्ष आणि भारत बायोटेक लिमिटेडचे ५.६ दशलक्ष डोसेस आहेत. सीरमकडे ५० दशलक्ष डोसेसचा साठा असून ती दरमहा ६० दशलक्ष डोसेसची निर्मिती करते. बीबीएलकडे २० दशलक्ष डोसेसचा साठा असून तिची महिन्याला १० दशलक्ष डोसेस निर्मितीची क्षमता आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकारmedicineऔषधं