पद्मब्रा?ाण संघमच्या वतीने सामुदायिक उपनयन संस्कार 251 मुला -मुलींनी घेतला सहभाग
By Admin | Updated: April 24, 2015 00:55 IST2015-04-24T00:55:22+5:302015-04-24T00:55:22+5:30
सोलापूर : र्शी भावनाऋषी व र्शी आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त पद्मब्रा?ाण पौरोहित संघम सोलापूरच्या वतीने गुरुवारी सकाळी 10 वाजता अशोक चौक येथील र्शीकृष्ण मंदिरात मोफत सामुदायिक उपनयन संस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक विधीसाठी 15 पुरोहितांनी जबाबदारी पार पाडली. हा धार्मिक विधी विश्वर्शी वेंकटेशमशास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.251 मुले-मुली यात सहभागी झाले होते.

पद्मब्रा?ाण संघमच्या वतीने सामुदायिक उपनयन संस्कार 251 मुला -मुलींनी घेतला सहभाग
स लापूर : र्शी भावनाऋषी व र्शी आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त पद्मब्रा?ाण पौरोहित संघम सोलापूरच्या वतीने गुरुवारी सकाळी 10 वाजता अशोक चौक येथील र्शीकृष्ण मंदिरात मोफत सामुदायिक उपनयन संस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक विधीसाठी 15 पुरोहितांनी जबाबदारी पार पाडली. हा धार्मिक विधी विश्वर्शी वेंकटेशमशास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.251 मुले-मुली यात सहभागी झाले होते.हिंदू धर्मात उपनयन संस्काराला महत्त्व आहे.र्शी भावनाऋषी व र्शी आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीचे औचित्य साधून पद्मशाली समाजबांधवांच्या मुला-मुलींसाठी पद्मब्रा?ाण पौरोहित संघमच्या वतीने हा धार्मिक विधी मागील वीस वर्षांपासून मोफत करण्यात येत आहे.यंदाच्या वर्षी 120 मुले व 131 मुली यात सहभागी झाले होते.पूर्व भागातील तेलुगू भाषिकांमध्ये यापूर्वी इतक्या मोठय़ा संख्येने उपनयन संस्कारासाठी मुले-मुली सहभागी झाले नव्हते. यंदा संघमच्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे मुख्य पुरोहित विश्वर्शी वेंकटेशमशास्त्री यांनी सांगितले.मुलांच्या जीवनावर सुसंस्कार घडावेत, त्यांच्या जीवनात यश लाभावे यासाठी गायत्रीमंत्राची दीक्षा देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमासाठी र्शी वेदांत स्वराज्य संघमचे पिठाधीपती ब्र?ार्शी अल्ली नरसिंह चैतन्यानंद स्वामीचे मार्गदर्शन लाभले.पद्मब्रा?ाण संघमचे सत्यनारायण जोग,शेखर बुर्ला,पुंडलिकानंद ताटीपामूल,गोविंद नागूल,राजेंद्रप्रसाद गड्डम,आयलय्या बोल्ली,अंबादास शावंतुल,मुरली सब्बन,अंबादास बिटला,कनकय्या यलदंडी,राजू बुर्ला आदींनी पौरोहिताचे कार्य पार पाडले. (प्रतिनिधी)चौकटसंस्कारक्षम समाजासाठी सामुदायिक उपक्रमसमाजातील मुला-मुलींवर बालपणापासून आपल्या धर्मातील आचार,विचार व विविध धार्मिक सोहळ्याचे महत्त्व कळले पाहिजे,चांगल्या रुढी परंपराचे जतन करणे आपले कर्तव्य आहे.या परंपरांची जपवणूक करताना कोणालाही आर्थिक भार सोसावा लागू नये म्हणून पद्मब्रा?ाण संघमने हा सामुदायिक मोफत उपनयनाचा उपक्रम मागील वीस वर्षांपासून अखंडपणे राबवत आहे असे संघमच्या वतीने सांगण्यात आले.