कम्युनिटी लीडरशीप पुरस्कार; तीन भारतीय महिलांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 04:44 IST2018-09-25T04:44:08+5:302018-09-25T04:44:17+5:30
उत्तम समाजकार्य करणाऱ्या पाच महिला कार्यकर्त्यांना फेसबुकने ग्लोबल कम्युनिटी लिडर्स या पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले आहे.

कम्युनिटी लीडरशीप पुरस्कार; तीन भारतीय महिलांची निवड
नवी दिल्ली - उत्तम समाजकार्य करणाऱ्या पाच महिला कार्यकर्त्यांना फेसबुकने ग्लोबल कम्युनिटी लिडर्स या पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये मातांना स्तनपानासाठी मदत करण्याकरिता ‘ब्रेस्टफिडिंग सपोर्ट फॉर इंडियन वूमन्सह्ण ही स्वयंसेवी संस्था स्थापन करणाºया पुण्याच्या आधुनिका प्रकाश, महिलांना उद्योजिका बनण्यासाठी प्रेरणा देणाºया मॉमप्रिनर्स इंडिया या मुंबईच्या संस्थेच्या संस्थापक चेतना मिस्रा, तसेच मातांना परस्परांच्या मदतीसाठी स्थापन केलेल्या बेबी डेस्टिनेशन या दिल्लीतील संस्थेच्या संस्थापक तमन्ना धमिजा या तीन भारतीय महिलांचा समावेश आहे.
पाचही सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्येकी १० लाख डॉलरचा पुरस्कार फेसबुकतर्फे देण्यात येईल. या पुरस्कार विजेत्यांची जगभरातील सहा हजार नावांतून निवड करण्यात आली आहे. पुरस्कारविजेत्या तीनही भारतीय महिलांना प्रत्येकी पन्नास हजार डॉलरची फेलोशिपही देण्यात येईल.