शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

Communal Violence: राजस्थानच्या भीलवाडानंतर आता हनुमानगडमध्येही तणाव, VHP नेत्यावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 09:34 IST

Communal Voilence In Rajasthan: विश्व हिंदू परिषदच्या नेत्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Communal Voilence In Rajasthan:राजस्थानमध्ये पुन्हा एकदा जातीय तणावाचे प्रकरण समोर आले आहे. हनुमानगड जिल्ह्यात बुधवारी रात्री विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) स्थानिक नेत्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. सध्या विहिंप नेत्याला बिकानेर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यातील नोहरमध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते सतवीर सहारन यांना काही लोकांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सतवीर सहारनचे काही साथीदारही जखमी झाले आहेत. हे संपूर्ण प्रकरण हनुमानगढच्या नोहर येथील मंदिरासमोर झाले. येथील काही तरुण अनेकदा महिलांची छेड काढत असे. यावर सतवीरने त्या तरुणांना हटकल्यामुळे वाद सुरू झाला.  यावेळी हल्लेखोरांनी सतवीरच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.

विहिंप कार्यकर्त्यांचा चक्काजामया घटनेनंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नोहर रावतसर रस्ता अडवला. संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. हनुमानगडचे जिल्हाधिकारी आणि एसपी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती हाताळली.

परिसरातील इंटरनेट सेवा बंदआरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा येथून हलणार नाही, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. त्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 6 जणांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर रात्री उशिरापासून नोहर, भद्रा आणि रावतसरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन परिसरात फ्लॅग मार्च काढत आहे. अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliceपोलिस