शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सांप्रदायिक दंगल: महाराष्ट्रात दोषसिद्धी १.२७ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 11:35 IST

देशभरातील प्रमाण ५.७० टक्के, उत्तर प्रदेश १७.२५ टक्केवारीने अग्रणी. २०२० मध्ये हरियाण, बिहार, महाराष्ट्रात सर्वाधिक सांप्रदायिक दंगली.

हरिश गुप्ता

नवी दिल्ली :  गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सांप्रदायिक दंगलीच्या खटल्यातील दोषसिद्धीचे प्रमाण अवघे १.२७ टक्के असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरातील या प्रकरणातील दोषसिद्धीचे प्रमाण  राष्ट्रीय सरासरी ५.७० टक्क्यांपेक्षाही महाराष्ट्रातील प्रमाण खूपच कमी आहे. अधिकृत सूत्रांकडून प्राप्त आकडेवारीनुसार ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांनी सांप्रदायिक दंगलीप्रकरणी १७२४४ व्यक्तींविरुद्ध आरोपपत्रे दाखल केली होती; परंतु, त्यापैकी ९८४ व्यक्तींना दोषी ठरविण्यात आले असून दोषसिद्धीचे प्रमाण ५.७० टक्के आहे.

महाराष्ट्रात २०१६ ते २०२० या पाच वर्षांत सांप्रदायिक दंगलीप्रकरणी २५११ जणांविरुद्ध आरोपपत्रे दाखल करण्यात आली होती. यापैकी फक्त ३२ लोकांनाच दोषसिद्ध ठरविण्यात यश आले.  २०१९ मध्ये महाराष्ट्रात सांप्रदायिक दंगलीप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या ७८० पैकी एकालाही दोषसिद्ध ठरविण्यात आले नाही. २०१८ आणि २०२० मध्येही सांप्रदायिक दंगलीचे सर्व आरोपी सुटले. २०१७ आणि २०१९ मध्येच बोटावर मोजण्याइतपत आरोपींना दोषी ठरविण्यात आले.

हरियाणा आणि बिहारमधील सांप्रदायिक दंगल प्रकरणातील दोषसिद्धीचे प्रमाणही निराशाजनक आहे.  २०१६ ते २०२० या पाच वर्षांत दोन्ही राज्यांत अनुक्रमे १९ आणि  ८४ व्यक्तींना दोषी ठरविण्यात आले. तथापि, उत्तर प्रदेशातील स्थिती चांगली दिसते. गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशात सांप्रदायिक दंगलीच्या गुन्ह्याप्रकरणी ७०७ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आली होती; पैकी १२२ जणांना दोषी ठरविण्यात आले असून उत्तर प्रदेशात गेल्या पाच वर्षांतील दोषसिद्धीचे प्रमाण १७.२५ टक्के आहे.  २०२० मध्ये उत्तर प्रदेश, गोवा, कर्नाटक, पंजाब आणि  तेलंगणसह १९ राज्यांत एकही सांप्रदायिक दंगल घडली नाही. 

कोणत्या राज्यात किती दंगलीहरियाणा, बिहार आणि महाराष्ट्रात २०२० मध्ये  सर्वाधिक सांप्रदायिक दंगली घडल्या, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात  २०१८, २०१९ आणि  २०२० या तीन वर्षांत एकही सांप्रदायिक दंगल घडली नाही. गेल्या पाच वर्षांत बिहारमध्ये ७२१, महाराष्ट्रात २९५ आणि हरियाणात ४१२ सांप्रदायिक दंगलीच्या घटना घडल्या.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेश