सहआयुक्त अनुपकुमारांना निरोप
By Admin | Updated: May 16, 2015 02:32 IST2015-05-16T02:32:36+5:302015-05-16T02:32:36+5:30
सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग यांना शनिवारी पदमुक्त केले जाणार असल्याची माहिती आहे.

सहआयुक्त अनुपकुमारांना निरोप
नागपूर : सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग यांना शनिवारी पदमुक्त केले जाणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले सहपोलीस आयुक्त राजवर्धन शनिवारी किंवा सोमवारी पदभार स्वीकारतील.
महिनाभरापूर्वी झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यानुसार नागपुरातील पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या अनुक्रमे पुणे आणि मुंबईला झाल्या. पुण्यातील सीआयडी प्रमुख शारदा प्रसाद यादव नागपुरात रुजू झाले. मात्र, सहआयुक्त अनुपकुमार आणि अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे यांच्या जागेवर येणारे अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कार्यमुक्त करता आले नाही. या पार्श्वभूमीवर सहआयुक्त राजवर्धन यांचे प्रशिक्षण आणि त्यानंतरच्या सुट्यांचा कालावधी १५ मे रोजी पूर्ण झाला. त्यामुळे ते शनिवारी नागपुरात रुजू होण्याची शक्यता आहे. १९९७ च्या बॅचचे आयपीएस असलेले राजवर्धन मुंबईला अतिरिक्त आयुक्त म्हणून आतापावेतो सेवारत होते.
आता ते नागपूरचे सहआयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे तर, बदलून जाणारे सहआयुक्त अनुपकुमार मुंबईला त्याच पदावर प्रशासनाची जबाबदारी सांभाळणार असून, त्यांना शनिवारी कार्यमुक्त केले जाणार आहे.(प्रतिनिधी)