पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी आयुक्तांना निवेदन
By Admin | Updated: April 5, 2016 22:39 IST2016-04-05T22:02:06+5:302016-04-05T22:39:57+5:30
नाशिक : मखमलाबाद परिसरातील ओमनगर येथे पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, या परिसरात सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी होत असून, यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना शिवराज्य अभिषेक सेनेने निवेदन दिले.

पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी आयुक्तांना निवेदन
नाशिक : मखमलाबाद परिसरातील ओमनगर येथे पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, या परिसरात सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी होत असून, यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना शिवराज्य अभिषेक सेनेने निवेदन दिले.
ओमनगर परिसरातील नागरिकांना रस्त्याचा प्रश्न, अनियमित घंटागाडी व त्यामुळे पसरणारी अस्वच्छता समस्या भेडसावत असून, विभागीय अधिकारी व संबंधित कार्यालयीन कर्मचार्यांकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांना पाणी, पथदीप, घंटागाडी, धूर फवारणी, रस्त्यांची साफसफाई, ड्रेनेजसंदर्भातील समस्यांंना तोंड द्यावे लागत असून, याप्रक रणी कार्यवाही करण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.