स्मार्ट सिटीसाठी आयुक्त जाणार इस्त्रायलला स्थायी सभा: भुयारी रेल्वे पुलाचा मार्ग मोकळा

By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:12+5:302015-08-28T23:37:12+5:30

सोलापूर : केंद्र सरकारने सोलापूरचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश केल्यानंतर प्रशिक्षणासाठी महापालिकेचे आयुक्त विजयकुमार काळम?पाटील यांची इस्त्रायल दौर्‍यासाठी निवड केली आहे. या दौर्‍यासाठी येणार्‍या अडीच लाखांच्या खर्चास शुक्रवारच्या स्थायी सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.

Commissioner for Smart City to give Israel a permanent meeting: Get rid of the bridge bridge | स्मार्ट सिटीसाठी आयुक्त जाणार इस्त्रायलला स्थायी सभा: भुयारी रेल्वे पुलाचा मार्ग मोकळा

स्मार्ट सिटीसाठी आयुक्त जाणार इस्त्रायलला स्थायी सभा: भुयारी रेल्वे पुलाचा मार्ग मोकळा

लापूर : केंद्र सरकारने सोलापूरचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश केल्यानंतर प्रशिक्षणासाठी महापालिकेचे आयुक्त विजयकुमार काळम?पाटील यांची इस्त्रायल दौर्‍यासाठी निवड केली आहे. या दौर्‍यासाठी येणार्‍या अडीच लाखांच्या खर्चास शुक्रवारच्या स्थायी सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.
स्थायी समितीची सभा सभापती पद्माकर काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत तातडीच्या विषयाला आयुक्तांच्या इस्त्रायल दौर्‍याच्या खर्चास मंजुरी देण्याचा विषय चर्चेला आला. स्मार्ट सिटी योजनेचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील ठाणे, नागपूर आणि सोलापूर महापालिका आयुक्तांची इस्त्रायल दौर्‍यासाठी केंद्र शासनाने निवड केली आहे. 4 नोव्हेंबर रोजी हा दौरा असणार आहे. आयुक्तांच्या अधिकार खर्चातून अभ्यास दौर्‍याच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.
त्याचबरोबर शमी क?य़ाचे सुशोभीकरण, मडकी वस्तीजवळ फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरूस्तीचा खर्च, उजनी जलवाहिनीवरील पाणीचोरी पकडताना केलेल्या वेल्डिंगचा खर्च, टाकळी जलवाहिनीवरील गळती दुरूस्तीचा खर्च, जेटिंग मशीनच्या दुरूस्ती खर्चाला एकमताने मान्यता देण्यात आली. जवाहर सोसायटी ते अंत्रोळीकरनगरापर्यंत स्ट्रॉमड्रेन लाईन घालणे, केशवनगर झोपडप?ीतील जुने शौचालय पाडून नवीन बांधणे व जागा भाड्याने देण्याचा विषय बहुमताने मंजूर करण्यात आला. एलबीटी वसुली घटल्यावर तत्कालीन आयुक्त गुडेवार यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दोन वेतनवाढी रोखल्या होत्या. 23 अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वेतनवाढ स्थगितीचे आदेश रद्द करण्यास बहुमताने मंजुरी देण्यात आली.
इन्फो..
भुयारी पुलासाठी 37 लाख
अरविंद धाम पोलीस वसाहतीजवळ भुयारी रेल्वे पूल बांधण्यासाठी कन्सल्टन्सी नेमण्यासाठी 37 लाखांच्या खर्चास एकमताने मंजुरी देण्यात आली. जुना पुणे नाका ते मंगळवेढा रोड तेथून विजापूर रोडवर सोरेगावपर्यंत 58 फुटी रस्ता करण्याचे नियोजित आहे. भुयारी रेल्वे मार्गामुळे काम रखडले आहे. या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या खर्चास मंजुरी दिल्याने आता पूल उभारण्याच्या कामाला गती येणार आहे.

Web Title: Commissioner for Smart City to give Israel a permanent meeting: Get rid of the bridge bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.