‘आयोगाने ईव्हीएम द्यावे, आम्ही हॅक करून दाखवू’
By Admin | Updated: May 12, 2017 00:04 IST2017-05-12T00:04:53+5:302017-05-12T00:04:53+5:30
अलीकडे वापरलेले कोणतेही एक ईव्हीएम आम्हाला द्या, आम्ही ते हॅक करून दाखवू, असे आव्हान आम आदमी पार्टीने गुरुवारी निवडणूक आयोगाला दिले.

‘आयोगाने ईव्हीएम द्यावे, आम्ही हॅक करून दाखवू’
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अलीकडे वापरलेले कोणतेही एक ईव्हीएम आम्हाला द्या, आम्ही ते हॅक करून दाखवू, असे आव्हान आम आदमी पार्टीने गुरुवारी निवडणूक आयोगाला दिले.
तत्पूर्वी पुढील निवडणुकांत व्होटर व्हेरिफायेबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) सुविधेने युक्त इलेक्ट्रानिक व्होटिंग मशीनचा वापर करावा, या मागणीसाठी आपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गुरुवारी निवडणूक आयोगासमोर धरणे धरली.
आपने ईव्हीएमसारख्या उपकरणात फेरफार शक्य असल्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते. मात्र, आयोगाने आपचा दावा फेटाळला होता. त्या पार्श्वभूमीवर आपने हे आव्हान दिले. ईव्हीएममध्ये फेरफाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आयोगाच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणीही आपने केली.
हे प्रात्यक्षिक आंदोलकांत पक्षांच्या आमदारांसह दिल्लीचे नवनियुक्त समन्वयक गोपाल राय यांचा समावेश होता.