जेएनयूच्या धोरणावर केली होती टीका
By Admin | Updated: March 15, 2017 00:55 IST2017-03-15T00:55:45+5:302017-03-15T00:55:45+5:30
आत्महत्या करण्यापूर्वी मुत्तू कृष्णन (२८) या दलित विद्यार्थ्याने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) प्रवेश धोरणावर फेसबुक पोस्टवर टीका केली होती

जेएनयूच्या धोरणावर केली होती टीका
नवी दिल्ली : आत्महत्या करण्यापूर्वी मुत्तू कृष्णन (२८) या दलित विद्यार्थ्याने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) प्रवेश धोरणावर फेसबुक पोस्टवर टीका केली होती. निदर्शने करण्यास केलेल्या बंदीवरही त्याने टीका केली होती. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी पक्षपात होत असल्याच्या आरोपांवर काहीही बोलण्यास नकार दिला. कुलगुरू जगदीश कुमार यांनी टिष्ट्वटरवर कृष्णन याच्या मृत्युबद्दल सांत्वन केले आहे.
पोलिसांनीही कृष्णन याचा विद्यापीठात सक्रिय असलेल्या कोणत्याही राजकीय गटाशी संबंध नसल्याचे सांगितले. मुत्तूच्या वडिलांनी तसेच तमिळनाडूत अण्णा द्रमुक आणि द्रमुकने कृष्णन याच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी केली. मागच्यावर्षी रोहित वेमुला याने आत्महत्या केल्यावर विद्यापीठाच्या प्रशासनाविरोधात झालेल्या चळवळीत तो आघाडीवर होता.