कमांडोनी चार तासात सात अतिरेकी तळ केले उद्धवस्त
By Admin | Updated: September 29, 2016 15:06 IST2016-09-29T15:06:36+5:302016-09-29T15:06:51+5:30
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारावर भारतीय कमांडोंनी बुधवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

कमांडोनी चार तासात सात अतिरेकी तळ केले उद्धवस्त
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारावर भारतीय कमांडोंनी बुधवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हे दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत असताना अचानक हल्ला केला.
रात्री साडेबारा ते पहाटे साडेचार अशी चार तास ही कारवाई सुरु होती. कमांडो नियंत्रण रेषा पार करुन तीन किमी आतपर्यंत घुसले. पाकव्याप्त काश्मीरमधील भीमबेर, हॉटस्प्रिंग, केल आणि लिपा सेक्टरमध्ये हल्ले चढवले.
या कारवाईमध्ये सात दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारतीय कमांडोंना हॅलिकॉप्टरने पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरवण्यात आले. या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले.