लवकरच येणार एक हजारची नवी नोट

By Admin | Updated: November 10, 2016 14:04 IST2016-11-10T12:52:07+5:302016-11-10T14:04:29+5:30

चलनातून बाद करण्यात आलेली एक हजार रुपयांची नोटही लवकरच व्यवहारात येणार आहे.

Coming soon, a new note of 1,000 | लवकरच येणार एक हजारची नवी नोट

लवकरच येणार एक हजारची नवी नोट

 ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर सरकराने 500 आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची घोषणा केली होती. दरम्यान, चलनातून बाद करण्यात आलेली एक हजार रुपयांची नोटही लवकरच व्यवहारात येणार आहे. वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी आज ही माहिती दिली आहे.
 
"पुढच्या काही महिन्यांमध्ये एक हजार रुपयांची नोट चलनात आणली जाईल. तिचे स्वरूप आणि आकार बदललेला असेल," असे शक्तिकांता दास यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच वेळोवेळी  इतर नोटाही नव्या सिरिजमध्ये  नवनव्या स्वरूपात चलनात आणल्या जातील असेही त्यांनी सांगितले.  

Web Title: Coming soon, a new note of 1,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.