ही कॉमेडियन लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

By Admin | Updated: January 18, 2017 18:57 IST2017-01-18T18:57:18+5:302017-01-18T18:57:18+5:30

टेलिव्हिजनवरील वादग्रस्त शो कॉमेडी नाइट्स बचाओ मध्ये कृष्णा सोबत प्रेक्षकानां हसवणारी भारती सिंगने बॉयफ्रेंडबरोबर गुपचुप साखरपुडा उरकला आहे

This comedian will soon get married to a wedding aboard | ही कॉमेडियन लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

ही कॉमेडियन लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 18 - टेलिव्हिजनवरील वादग्रस्त शो कॉमेडी नाइट्स बचाओ मध्ये कृष्णा सोबत प्रेक्षकानां हसवणारी भारती सिंगने बॉयफ्रेंडबरोबर गुपचुप साखरपुडा उरकला आहे. वेगळ्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात तिने घर करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 
 
प्रेक्षकांना खळबळून हसवणाऱ्या भारती सिंगने प्रियकर हर्ष लिंबाचिया सोबत साखरपुडा केला आहे. ह्या कार्यक्रमासाठी दोन्ही   परिवारातील मोजकेच लोक उपस्थित होते. अतिशय खाजगीत हा संमारंभ पार पडला आहे. लकरच ते लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचे वृत्त  टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.  भारती आणि हर्ष यांच्यात मागील दोन वर्षापासून गुटरगू सुरु आहे. दोघांच्या वयात तब्बत आठ वर्षाचे अंतर आहे. भारती हर्ष पेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे. हर्ष हा कॉमेडी नाइट्स बचाओ या शो चा लेखक आहे. 
 
भारती-हर्ष यांच्या साखरपुड्याला विनोदवीर कृष्णा अभिषेक, कश्मिरा शाह, निर्माता विपुल शाह आणि भारतीच्या कार्यक्रमातील काही सहकलाकार उपस्थित होते. 
 

 

Web Title: This comedian will soon get married to a wedding aboard