शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आमच्या राज्यात या, बैठक घ्या! ‘कार्यकारिणी’साठी अनेक मुख्यमंत्र्यांचा पक्ष नेतृत्वाकडे आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 08:03 IST

राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आपल्याच राज्यात व्हावी, असा आग्रह अनेक राज्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केल्याने भाजप नेतृत्वावर दबाव आहे.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आपल्याच राज्यात व्हावी, असा आग्रह अनेक राज्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केल्याने भाजप नेतृत्वावर दबाव आहे. कर्नाटकात एप्रिल-मेमध्ये निवडणुका होत असून, तेथेच बैठक व्हावी, अशी मागणी या राज्यातून होत आहे. तसेच दुफळीने ग्रासलेल्या कर्नाटकमधील पक्षाला मतभेद दूर करण्यास मदत होईल, असे त्यांचे मत आहे. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही ही बैठक राज्यात व्हावी अशी विनंती पक्षाच्या हायकमांडकडे केली आहे. दिल्ली शाखेलाही ही कार्यकारिणी बैठक दिल्लीत व्हावी असे वाटते.  बैठकीच्या स्थळाबाबत भाजपने मात्र मौन बाळगले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात याबाबतच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. कार्यकारिणीची शेवटची बैठक ऑक्टोबर २०२२ मध्ये हैदराबादमध्ये झाली होती. 

अध्यक्षपदी कोण? 

जानेवारीत होणारी बैठक या अर्थाने महत्त्वपूर्ण आहे की, जे. पी. नड्डा यांची तीन वर्षांसाठी पुन्हा निवड करायची आहे. नड्डा यांच्या जागी सी. आर. पाटील यांच्या नावाचीही चर्चा आहे. जे. पी. नड्डा यांचे गृहराज्य हिमाचलमध्ये पराभव झाल्याने अनिश्चितताही आहे; परंतु नड्डा यांनी गेल्या तीन वर्षांत अत्यंत चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना दुसरी टर्म दिली जाईल, असे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण