शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लोकलला ग्लोबल करण्यासाठी नव्या कल्पना घेऊन पुढे या; पंतप्रधान मोदींचं आवाहन

By जयदीप दाभोळकर | Updated: January 2, 2021 13:28 IST

PM Narendra Modi : शेतीपासून ते अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रांपर्यंत स्टार्टअपची व्याप्ती आता वाढत असल्याचं पंतप्रधानांचं मत

ठळक मुद्देआजचे स्टार्टअप्सचं उद्याच्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी बनतील, पंतप्रधानांचा विश्वासविद्यार्थ्यांनी लोकलला ग्लोबल करण्यासाठी नव्या कल्पना घेऊन पुढे आलं पाहिजे.

कोरोना महासाथीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना 'लोकलसाठी व्होकल' होण्याचं आवाहन केलं होतं. तसंच आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे असंही ते म्हणाले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओदिशातील संबलपूर येथील आयआयएमच्या कॅप्सच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशभरातील आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी लोकलला ग्लोबल करण्यासाठी नव्या कल्पना घेऊन पुढे आलं पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. "भारतासाठी आता उत्तम वेळ आली आहे. आजचे स्टार्टअप्सचं उद्याच्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी बनतील. संबलपूर हे मोठं एज्युकेशन हब म्हणून उदयास येत आहे. संबलपूरच्या लोकललाही व्होकल बनवणं हे आपलं कर्तव्य आहे. जास्तीतजास्त स्टार्टअप्स हे २ टियर आणि ३ टियर शहरांमध्ये सुरू होत आहेत. शेतीपासून ते अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रांपर्यंत स्टार्टअपची व्याप्ती आता वाढत आहे," असं मोदी यावेळी म्हणाले. "देशातील नव्या क्षेत्रांमध्ये नवे अनुभव घेऊन बाहेर पडणारे मॅनेजमेंट तज्ज्ञ भारताला एका उंचीवर घेऊन जाण्यात मोलाची भूमिका निभावतील. भारतानं कोरोना महासाथीच्या संकटादरम्यानही गेल्या वर्षांच्या तुलनेत अधिक यूनिकॉर्न दिले आहेत. गेल्या दशकामध्ये भारतानं एक नवा ट्रेंड अनुभवला आहे. बाहेरील अनेक मल्टी नॅशनल कंपन्या भारतात आल्या आणि भारताच्याच भूमिवर त्यांनी विकासही केला. हे दशक आणि हा काळ भारतात नव्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या निर्मितीचा आहे," असंही त्यांनी नमूद केलं. नव्या कल्पना शोधण्याची गरजलोकलला ग्लोबल बनवण्यासाठी आयआयएमच्या विद्यार्थ्यांना आणखी नव्या इनोव्हेटिव्ह कल्पना शोधण्याची गरज आहे. आयआयएम स्थानिक उत्पादनं आणि जागतीक सहकार्य यांच्यातील एक पूल बनण्याचं काम करू शकतो. जेव्हा तुमच्यातील अनेक जण संबलपुरी टेक्सटाईल आणि कटकच्या फिलिगीरीला जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी आपलं कौशल्य वापरती, येथील पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करतील, तेव्हा आत्मनिर्भर भारत मोहिमेसह ओदिशाच्या विकासालाही गती मिळणार असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. मॅनेजमेंट स्किलच्या मागणीत वाढ"काम करण्याची पद्धत आणि मॅनेजमेंट स्किल्सची मागणी झपाट्यानं वाढत आहे. आज अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॅनेजमेंटची गरज आहे. कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची कल्पनेमुळे संपूर्ण जग ग्लोबल व्हिलेजमधून ग्लोबल वर्कप्लेसमध्ये बदललं आहे. भारतानंही हे नवे बदल गेल्या काही महिन्यात झपाट्यानं केले आहे," असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतStudentविद्यार्थी