चला, मतदान करू या!
By Admin | Updated: October 15, 2014 03:54 IST2014-10-15T02:58:20+5:302014-10-15T03:54:45+5:30
लोकशाहीने दिलेला हक्क बजावण्याचा आणि अत्युच्च कर्तव्यपूर्तीचा क्षण म्हणजे मतदान! सामाजिक सलोखा, सौहार्द आणि राजकीय स्वातंत्र्याच्या बळकटीकरणातील महत्त्वपूर्ण टप्पा आज पार पडत आहे.

चला, मतदान करू या!
मुंबई : लोकशाहीने दिलेला हक्क बजावण्याचा आणि अत्युच्च कर्तव्यपूर्तीचा क्षण म्हणजे मतदान! सामाजिक सलोखा, सौहार्द आणि राजकीय स्वातंत्र्याच्या बळकटीकरणातील महत्त्वपूर्ण टप्पा आज पार पडत आहे. चला, आपणही यात सहभागी होऊन मतदान करू या!!
मतदानाच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग नोंदवावा, यासाठी ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन भारतरत्न सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, जावेद अख्तर, धनराज पिल्ले, दीपिका पदुकोन, महेश भट, रोहिणी हट्टंगडी अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. महिनाभर चाललेल्या रणधुमाळीनंतर प्रत्यक्ष मतदानाचा दिवस येऊन ठेपला आहे. महाराष्ट्राची १३वी विधानसभा निवडण्यासाठी राज्यातील ८ कोटी ३३ लाख ९० हजार ३९३ मतदार बुधवारी (१५ आॅक्टोबर) सकाळी सात ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजावून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ४ हजार ११९ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत.