शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील सगेसोयरे मतदान करायला गुजरातमध्ये या हो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 11:23 IST

निजर, व्यारा, डांग उमेदवारांची विनंती

शांतीलाल गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कनिजर/तापी :  दक्षिण गुजरातमधील आदिवासी (एसटी) मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी काँग्रेस धडपडत असतांना महाराष्ट्र राज्य सरकारने गुजरातेत मतदानाला जाण्यास सीमावर्ती भागातील जिल्ह्यांना सुटी जाहीर केली आहे. त्याचा फायदा घेत या भागातील उमेदवारांनी महाराष्ट्रातील सग्यासोयऱ्यांना मदतीसाठी बोलावले आहे. ही कुमक उद्या व परवा दाखल होण्याची शक्यता आहे.

सुरत शहरात कामधंदा निमित्ताने जवळपास ४ ते ५ लाख मराठी भाषिक स्थायिक झाले आहेत. त्यांचा स्वतंत्र लिंबायत मतदार संघ तयार झाला असून तेथून भाजप, कांग्रेस व आप या प्रमुख पक्षांचे उमेदवार मराठी भाषिक आहेत. डांग मतदारसंघही नाशिकला लागूनच आहे. डांगमधून अनेक गुजराती नागरिक महाराष्ट्रात कामासाठी जातात. याशिवाय तापी जिल्ह्यातील निजर मतदार संघाला नंदुरबार, धुळे लागून आहे. हे दोन्ही जिल्हे आदिवासी बहुल असून त्यांचा तापी जिल्ह्याशी रोटी- बेटी व्यवहार आहे. विशेषतः या भागातील अनेक उमेदवार गावित (गुजराती भाषेत गामेत) जमातीचे आहेत. या उमेदवारांच्या मदतीसाठी महाराष्ट्राचे मंत्री विजयकुमार गावीत यांचा हातभार लागतो असे रामशरण गावित या कार्यकर्त्यांने सांगितले. निजरमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक मतदार व पाठीराखे येतात, असे स्थानिक रहिवासी संजयभाई विसावा यांनी सांगितले. निजरमध्ये सध्या १० टक्के मतदार मराठी भाषिक असल्याचे ते म्हणाले.  

 

 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Maharashtraमहाराष्ट्रVotingमतदान