शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : मोठी तयारी!'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
2
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
3
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
4
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
5
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
6
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
7
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
8
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
9
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
11
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
12
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
13
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
14
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
15
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
17
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
18
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
19
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
20
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!

कर्नल सोफिया कुरेशींचा राणी लक्ष्मीबाईंशी संबंध; आजोबांनीही सैन्यात राहून केलीय देशाची सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:11 IST

पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली.

Col Sofiya Qureshi: पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण माहिती जगासमोर उघडपणे सांगणाऱ्या भारतीय लष्कराच्या महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी या सामान्य योद्ध्या नाहीत. कर्नल सोफिया यांचे देशाच्या महान क्रांतिकारी राणी लक्ष्मीबाई यांच्याशीही नाते आहे. सोफिया कुरेशी यांनीच काही वर्षांपूर्वी याबाबत माहिती दिली होती. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचे संपूर्ण कुटुंबच देशाच्या सेवेसाठी काम करत आलं आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. ६ मेच्या रात्री पाकिस्तानच्या पीओजेकेवरील ९ दहशतवादी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करून उद्ध्वस्त करण्यात आले. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या दोन महिला अधिकाऱ्यांनी लष्कराने केलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यानंतर कर्तबगार अधिकारी अशी ओळख असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विषयी लोकांना उत्सुकता निर्माण झाली होती. त्यांच्याबाबत माहिती पुढे आल्यानंतर स्वातंत्र्यच्या काळातही त्यांच्या कुटुंबाचे योगदान असल्याचे समोर आले.

कर्नल सोफिया यांची पणजी राणी लक्ष्मीबाईंसोबत होत्या. राणी लक्ष्मीबाई यांनी स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरुद्ध लढाई केली होती त्यावेळी माझी पणजी त्यांच्यासोबत होती असं कर्नल सोफिया यांनी सांगितले. "मी फौजी मुलगी आहे, त्यामुळे मला लष्कराच्या वातावरणाची ओळख आहे. माझे वडील सैन्यात होते, माझे आजोबा सैन्यात होते आणि माझी पणजी राणी लक्ष्मीबाईंसोबत होती. ती एक योद्धा होती. माझ्या आईला आपण (मी किंवा माझी बहीण) सैन्यात जावे असे वाटत होते. माझे आजोबा म्हणायचे की सतर्क राहणे आणि राष्ट्राचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे," असे कर्नल सोफिया म्हणाल्या.

 लष्कराच्या सिग्नल कॉर्प्सशी संबंधित असलेल्या कर्नल सोफिया यांचा लष्कराशी दीर्घकाळ संबंध आहे. कर्नल सोफिया यांचे पती लष्करी अधिकारी आहेत आणि त्यांचे आजोबाही सैन्यात होते. कर्नल सोफिया यांचे पती लष्कराच्या मेकॅनाइज्ड इन्फंट्रीशी संबंधित आहेत आणि सध्या ते फ्रंटलाइनवर एका युनिटचे नेतृत्व करत आहेत.

मूळच्या गुजरातच्या असलेल्या कर्नल सोफिया २०१८ मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. पुण्यात आसियान देशांच्या सैन्यासोबत भारतीय लष्कराचा सराव झाला होता. या सरावात, कर्नल सोफिया यांना भारतीय लष्कराच्या तुकडीचे कमांडर बनवण्यात आले होते. कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानविरुद्धचे ऑपरेशन सिंदूर २५ मिनिटांत पूर्ण झाल्याची माहिती दिली होती. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवान