कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यावरील मोक्का हटवणार ?
By Admin | Updated: February 2, 2016 13:14 IST2016-02-02T13:03:13+5:302016-02-02T13:14:33+5:30
प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहीत यांच्यावर लावण्यात आलेला मोक्का हटवण्यासंदर्भात एनआयएने कायदा मंत्रालय आणि अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून मत मागितले आहे.

कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यावरील मोक्का हटवणार ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २- मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहीत यांच्यावर लावण्यात आलेला मोक्का हटवण्यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कायदा मंत्रालय आणि अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून मत मागितले आहे.
साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित आणि अन्य आठ जणांविरोधातील मोक्का हटवण्यासंदर्भात मत मागितले आहे. केंद्रात सत्ता पालट झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेची मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींबाबतची भूमिका सौम्य झाली आहे. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ मध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार झाले होते तर, १०० जण जखमी झाले होते.
या स्फोटात सहभागी असणा-या आरोपींवर मोक्का अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष कोर्ट स्थापन करण्यात आले आहे. आरएसएस स्वयंसेवक सुनील जोशी हत्या प्रकरणातही साध्वी आरोपी आहे.