‘कॉलेजियम’ पद्धतच योग्य; सरन्यायाधीशांचा पाठिंबा
By Admin | Updated: September 27, 2014 06:49 IST2014-09-27T06:49:44+5:302014-09-27T06:49:44+5:30
न्यायाधीश म्हणून सुमारे २१ वर्षांच्या कारकिर्दीनंतर न्या. लोढा शनिवारी सेवानिवृत्त होत आहेत.

‘कॉलेजियम’ पद्धतच योग्य; सरन्यायाधीशांचा पाठिंबा
नवी दिल्ली : न्यायाधीशांनीच न्यायाधीशांची निवड करण्याच्या सध्याच्या ‘कॉलेजियम’ पद्धतीचे मावळते सरन्यायाधीश न्या. राजेंद्रमल लोढा यांनी पुन्हा एकदा जोरदार समर्थन केले व याखेरीज अन्य कोणत्याही पद्धतीने न्यायाधीशांची निवड केली गेली तर न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य कदाचित त्यामुळे बाधीत होऊ शकेल, असे मत व्यक्त केले.
न्यायाधीश म्हणून सुमारे २१ वर्षांच्या कारकिर्दीनंतर न्या. लोढा शनिवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्याआधी शुक्रवारी न्यायालयीन कामकाजाच्या शेवटच्या दिवशी पत्रकारांशी बोलताना न्या. लोढा म्हणाले की, न्यायाधीशपदावर नियुक्तीसाठी कोणती व्यक्ती योग्य आहे हे न्यायाधीश मंडळीच अधिक चांगल्या प्रकारे जोखू शकतात.
न्यायाधीश म्हणून निवड करण्यासाठी विचार करायचा त्या व्यक्तीचे न्यायालयीन कौशल्य, वर्तन, कायद्याचे ज्ञान यासह व्यक्तिमत्वाच्या इतरही अनेक पैलूंचे मूल्यमापन न्यायाधीशच अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. कारण न्यायाधीश त्या व्यक्तीला न्यायालयात काम कराताना पाहात आलेले असतात, असे आपले व्यक्तिगगत मत असल्याचेही न्या. लोढा म्हणाले. त्यांचे असेही म्हणणे होते की, ज्यात न्यायाधीशांखेरीज वा त्यांच्यासोबत इतर व्यक्ती आहेत, अश निवड पद्धतीने न्यायाधीश निवडले गेले तर कदाचित त्यामुळे न्यायसंस्थेच्या स्वातंत्र्यास बाधा येऊ श्कते, असे मला वाटते. (लोकमत न्यूज नेटवर्क)