अश्लील मॉर्फ फोटो पोस्ट करुन कॉलेज तरुणींची बदनामी
By Admin | Updated: August 24, 2016 17:19 IST2016-08-24T17:19:14+5:302016-08-24T17:19:14+5:30
उत्तरप्रदेशातील ५० महाविद्यालयीन युवतींचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मिडीयामध्ये फिरत असून, कॉलगर्ल म्हणून या तरुणींची बदनामी करण्यात येत आहे.

अश्लील मॉर्फ फोटो पोस्ट करुन कॉलेज तरुणींची बदनामी
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २४ - उत्तरप्रदेशातील ५० महाविद्यालयीन युवतींचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मिडीयामध्ये फिरत असून, कॉलगर्ल म्हणून या तरुणींची बदनामी करण्यात येत आहे. या प्रकाराचा तरुणींना आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड त्रास होत आहे. वर्षभराच्या आत दुस-यांदा असा प्रकार घडला आहे. यातील बहुतांश मुली वुंदावनच्या आहेत.
नग्न, अर्धनग्न छायाचित्रांवर मॉर्फ करुन तरुणींचे चेहरे चिकटवण्यात आले आहेत. व्हॉटसअॅपवर हे फोटो फिरत असून, फोटोखाली या तरुणींचा पत्ता आणि रेट पोस्ट करण्यात आला आहे. काही मुली लखनऊ आणि पाटण्याच्या आहेत. नोव्हेंबर २०१५ मध्ये सुद्धा असाच प्रकार घडला होता. एका पीडित तरुणीच्या वडिलांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांना नैराश्य आले होते.
त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली मात्र कोणावरही कारवाई झाली नाही. वृंदावनमधील एका पूजा-याने यासाठी पोलिसांना जबाबदार धरले आहे. पोलिसांनी त्यावेळी संवेदनाहिनता दाखवल्यामुळे हा गुन्हा पुन्हा घडला असे त्याने सांगतिले. पोलिसांनी आरोपींना वेळीच पकडले असते तर, मुलींची त्यांच्या कुटुंबांची बदनामी टळली असती असे त्याने सांगितले.