कोल्हापुरात महाविद्यालयीन तरुणीचा वर्गातच मृत्यू

By Admin | Updated: September 3, 2015 23:52 IST2015-09-03T23:52:53+5:302015-09-03T23:52:53+5:30

कोल्हापूर : स. म. लोहिया कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकणार्‍या प्राची पंडित कांबळे (१७) हिचा गुरुवारी सकाळी वर्गातच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

College girl dies in class | कोल्हापुरात महाविद्यालयीन तरुणीचा वर्गातच मृत्यू

कोल्हापुरात महाविद्यालयीन तरुणीचा वर्गातच मृत्यू

ल्हापूर : स. म. लोहिया कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकणार्‍या प्राची पंडित कांबळे (१७) हिचा गुरुवारी सकाळी वर्गातच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
सकाळी ७:२० वाजता प्राचीला वडील पंडित कांबळे यांनी महाविद्यालयात सोडले. वर्गातच तिला चक्कर आल्यासारखे झाल्यामुळे तिच्या सहकारी विद्यार्थिनींनी तिला खाली आणले. यावेळी शिक्षकही त्याठिकाणी आले. तिला राजारामपुरी येथील दुसर्‍या एका खासगी रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
------
प्राचीने आपल्या वडिलांकडे मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा काही वर्षांपूर्वी बोलून दाखविली होती. त्याप्रमाणे कांबळे कुटुंबीयांनी तिचे नेत्रदान केले.

Web Title: College girl dies in class