जिल्हाधिकारी कार्यालयातील कारकून एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: June 3, 2014 00:59 IST2014-06-03T00:59:27+5:302014-06-03T00:59:27+5:30
नागपूर : ५० हजारांची लाच मागणार्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकार्यांनी जेरबंद केले. सचिन सुधाकर शिंदे (वय ३८) असे आरोपीचे नाव असून, तो जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकून आहे. या प्रकरणात दुसरा एक अधिकारीही गुंतला असल्याची जोरदार चर्चा आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कारकून एसीबीच्या जाळ्यात
न गपूर : ५० हजारांची लाच मागणार्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकार्यांनी जेरबंद केले. सचिन सुधाकर शिंदे (वय ३८) असे आरोपीचे नाव असून, तो जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकून आहे. या प्रकरणात दुसरा एक अधिकारीही गुंतला असल्याची जोरदार चर्चा आहे. तक्रारदाराची (नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे) मौजा इसासनी (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथे शेतजमीन आहे. या भागात जमिनीला सोन्याची किंमत आल्यामुळे तेथे ले-आऊट टाकून भूखंड विकण्याचा सपाटाच अनेकांनी लावला आहे. परिणामी या भागातील कृषक जमिनी झपाट्याने अकृषक होत आहेत. अर्जदाराने येथील आपली जमीन अकृषक करण्याचा आदेश आणि जागेचा सुधारित नकाशा मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. त्यांनी रीतसर सर्व कागदपत्रेही दिली होती. मात्र, हे काम करून देण्याच्या बदल्यात ५० हजारांची लाच मागितली होती. घासाघीस केल्यानंतर शिंदेने १० हजारात तडजोड केली. दरम्यान, तक्रारकर्त्याने एसीबीच्या अधिकार्यांकडे धाव घेतली. एसीबीचे अधीक्षक वसंत शिरभाते, अतिरिक्त अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला आणि आज सायंकाळी एसीबीच्या पथकाने १० हजारांची लाच स्वीकारताना शिंदेला जेरबंद केले. या कारवाईनंतर एसीबीने त्याच्या महाल भागातील घरी झडती सुरू केली. त्यात काय मिळाले, ते वृत्त लिहिस्तोवर कळू शकले नाही. ----