शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जिल्हाधिकाऱ्याने पूरग्रस्त केरळमध्ये नऊ दिवस वाहून नेली खोकी, केली साफसफाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 3:52 AM

एखादा जिल्हाधिकारी म्हटल्यावर आपल्यासमोर जी प्रतिमा उभी राहते ती म्हणजे सरकारी गाडीतून फिरणारा.

- खुशालचंद बाहेती मुंबई : एखादा जिल्हाधिकारी म्हटल्यावर आपल्यासमोर जी प्रतिमा उभी राहते ती म्हणजे सरकारी गाडीतून फिरणारा... मागे-पुढे अधिकारी असणारा... आदेश सोडणारा, कर्मचाºयांकडून कामे करवून घेणारा....परंतु हा समज खोटा ठरवत एका जिल्हाधिकाºयाने पूरग्रस्त केरळमध्ये ९ दिवस पडेल ती कामे केली...त्याने मदतीची खोकी डोक्यावर वाहून नेली... कॅम्पमध्ये स्वच्छता केली... सर्व प्रकारची कामे तो करीत होता...तेही आपली ओळख लपवून...एखाद्या सर्वसामान्य स्वयंसेवकाप्रमाणे...केरळच्या पुराने सारे जग हळहळले असताना या संवेदनशील जिल्हाधिकाºयाने साधेपणाने जे काम केले, ते सर्वांनाच आदर्शवत ठरणारे आहे.या जिल्हाधिकाºयाचे नाव आहे कन्नन गोपीनाथन आणि ते दादरा-नगर हवेली येथे जिल्हाधिकारी आहेत. केरळ पूरग्रस्तांच्या शिबिरामध्ये ९ दिवस सर्व प्रकारच्या अंगमेहनतीची कामे करणारा ३२ वर्षे वयाचा तरुण भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असल्याचे उघड झाले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे आपली ओळख उघड होताच जितक्या गुपचूपपणे तो स्वयंसेवक म्हणून आला होता तितक्याच गुपचूपपणे शिबिरातून निघूनही गेला.२०१२ च्या प्रशासकीय अधिकाºयांच्या बॅचमधील कन्नन गोपीनाथन हे मूळचे केरळमधील पुटुथल्ली येथील राहणारे. २६ आॅगस्ट रोजी दादरा-नगर हवेली केंद्रशासित प्रदेश सरकारतर्फे पूरग्रस्त निधीसाठी १ कोटीचा चेक घेऊन ते तिरुवअनंतपुरम येथे गेले. केरळात जाण्यापूर्वीच त्यांनी दीर्घ कालावधीची सुटी मंजूर करून घेतली होती. सुटी मंजूर करणाºयांनी त्यांना संकटग्रस्त कुटुंबियांना भेटण्यासाठी सुटी हवी असावी, म्हणून मंजूर केली. चेक केरळ मुख्यमंत्री कार्यालयात जमा केल्यानंतर त्यांनी बस पकडली; पण ही बस आपल्या गावासाठी नव्हे, तर अति नुकसान झालेल्या चेंगन्नूर या ठिकाणची. येथे त्यांनी पूरग्रस्तांच्या शिबिरात लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. आलेल्या मदतीची खोकी ट्रकमधून उतरवून डोक्यावर वाहून कॅम्पमध्ये नेण्यापासून त्यांचे वितरण, कॅम्पमधील स्वच्छता करणे, अशा सर्व प्रकारची कामे ते करीत होते. नवव्या दिवशी पाहणीसाठी वरिष्ठ अधिकाºयांचे एक पथक आले होते. त्यातील अधिकारी मदत छावणीमधील सुविधांची पाहणी करताना स्वयंसेवकांच्याही अडचणी समजून घेत होते. त्यावेळी अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयाला ओळखले.>ओळख उघड झाल्यावर सोडले शिबीरओळख उघड झाल्याचे लक्षात येताच जितक्या गुपचूपपणे ते स्वयंसेवकांत सामील झाले होते. तितक्याच गुपचूपपणे शिबीर सोडले.दादरा-नगर हवेली येथे कामावर हजर झाल्यानंतर तेथील प्रशासनाने त्यांचा केरळमधील कालावधी हा रजा न धरता आॅन आॅफिशियल ड्यूटी म्हणून मंजूर केला.>गेल्या ९ दिवसांपासून आपल्यासोबत काम करणारा हा तरुण चक्क जिल्हाधिकारी आहे हे समजताच स्वयंसेवक आणि शिबिरातील लोकांना धक्काच बसला. काही स्वयंसेवकांना त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोहही आवरला नाही.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर