शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एससी/एसटी दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांची सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 06:42 IST

अनुसूचित जाती/जमाती कायदा २०१८च्या विरोधात दाखल झालेल्या आव्हान याचिका व केंद्र सरकारचा फेरआढावा याबद्दलची एकत्रित सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठापुढे घेण्यात येईल.

नवी दिल्ली : अनुसूचित जाती/जमाती कायदा २०१८च्या विरोधात दाखल झालेल्या आव्हान याचिका व केंद्र सरकारचा फेरआढावा याबद्दलची एकत्रित सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठापुढे घेण्यात येईल. याबाबत लवकरच पावले उचलण्यात येतील असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने शुक्रवारी नमूद केले.अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी सांगितले की, या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका व केंद्राने घेतलेल्या फेरआढाव्याची एकत्रित सुनावणी घेण्यात यावी असा आदेश न्या. ए. के. सिक्री यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिला होता. अनुसूचित जाती/जमातीच्या लोकांवर अत्याचार करणाऱ्यांना जामीन न मिळण्याची तरतूद कायम ठेवलेल्या या कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या कायद्याच्या अंतर्गत अटक होण्यापासून काही संरक्षण मिळण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात भूमिका घेत केंद्र सरकारने गेल्या वर्षी कायद्यात दुरुस्ती केली. या कायद्याला दिलेले आव्हान व केंद्र सरकारचा फेरआढावा याबाबत दाखल झालेल्या याचिकांमध्ये समान कायदेशीर मुद्दे उपस्थित करण्यात आल्याने त्यांची एकत्रित सुनावणी घ्यावी अशी विनंती अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी न्यायालयाला केली होती.निरपराधांवर अन्यायाची शक्यता?अनुसूचित जाती/जमातींवर अत्याचार करणाºया व्यक्तीविरोधात तक्रार आल्यानंतर त्याला फौजदारी गुन्ह्याखाली अटक करावी. त्याची प्राथमिक चौकशी करण्याची आवश्यकता नाही, तसेच या आरोपीस जामीनही मिळणार नाही अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे निरपराधांवर अन्याय होऊ शकतो असा आक्षेप याचिकांमध्ये घेण्यात आला आहे.

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय