शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

जातींची माहिती गोळा करा; पण राजकारण नको, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 06:46 IST

Rashtriya Swayamsevak Sangh : विशिष्ट समुदाय किंवा जातींची माहिती गोळा करण्यावर आमचा आक्षेप नाही. ही माहिती या वर्गांचे कल्याण करण्यासाठी वापरली जावी. निवडणुकीत राजकीय हत्यार म्हणून उपयोग करू नये, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे.

पलक्कड : विशिष्ट समुदाय किंवा जातींची माहिती गोळा करण्यावर आमचा आक्षेप नाही. ही माहिती या वर्गांचे कल्याण करण्यासाठी वापरली जावी. निवडणुकीत राजकीय हत्यार म्हणून उपयोग करू नये, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे.

रा. स्व. संघाची तीन दिवसांची समन्वय बैठक संपल्यानंतर संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की, जाती व जात-संबंध हा देशाचे ऐक्य व अखंडतेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्याबाबत काळजीपूर्वक पावले उचलावीत. या समुदाय किंवा जातींच्या  गोळा केलेल्या माहितीचा उपयोग त्यांच्या विकासासाठी करावा. निवडणुकांत विजय मिळविण्यासाठी वापर होऊ नये.  जातनिहाय गणनेची काँग्रेस, समाजवादी पक्ष व इंडिया आघाडीतील अन्य घटक पक्षांनी मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर रा. स्व. संघाने आपली भूमिका मांडली. (वृत्तसंस्था)

पश्चिम बंगालमधील घटनेचा केला निषेध - पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व तिची हत्या या अमानुष घटनेचा रा. स्व. संघाने निषेध केला आहे. - महिलांना जलद न्याय मिळावा यासाठी विद्यमान कायद्यांचा फेरविचार करून योग्य तरतुदी कराव्यात, अशी मागणी संघाने केली. - शाळा, महाविद्यालयीन स्तरावर मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात यावेत, अशीही मागणी संघाने केली. 

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndiaभारत