शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

योगी सरकारने लाँच केले 'कोविड अ‍ॅप', लॉग इन केल्यानंतर मिळणार कोरोना रिपोर्ट

By ravalnath.patil | Updated: September 21, 2020 09:37 IST

हे अ‍ॅप ओटीपी (OTP) आधारित आहे.

ठळक मुद्देया अ‍ॅपवर कोरोना अहवालाबद्दल सर्व सविस्तर माहिती  मिळणार आहे.कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता उत्तर प्रदेशातील शाळा व महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार नाहीत.

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने कोविड अ‍ॅप लाँच केले आहे. त्यामुळे आता कोरोना बाधित रूग्णांना अहवाल  मिळविण्यासाठी इकडे तिकडे फिरण्याची गरज भासणार नाही. या अ‍ॅपवर लॉग इन करून कोरोना रुग्णांना त्यांचा अहवाल मिळवता येणार आहे.

हे अ‍ॅप ओटीपी (OTP) आधारित आहे. कोरोना रुग्णाला आपला अहवाल पाहण्यासाठी या अ‍ॅपवर लॉग इन करावे लागेल. यासाठी लॉग इन करताना आपल्या फोनवर एक ओटीपी येईल. हा ओटीपीने अ‍ॅपमध्ये लॉग इन होईल. त्यानंतर कोरोना रुग्णाला त्याचा अहवाल पाहता येणार आहे.

या अ‍ॅपवर कोरोना अहवालाबद्दल सर्व सविस्तर माहिती  मिळणार आहे. कोरोनाची टेस्ट केल्यानंतर येणारा अहवाल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. हे पाहण्यासाठी रुग्णालयात भेट देण्याची आवश्यकता नाही. आता या अ‍ॅपद्वारे कोरोना अहवाल मिळणार आहे.

दुसरीकडे, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता उत्तर प्रदेशातील शाळा व महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार नाहीत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता सध्या शाळा व महाविद्यालये उघडण्याची परवानगी देता येणार नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे. तर राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाळा उघडणे शक्य नाही, असे माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने २१ सप्टेंबरपासून ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा-महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे सध्या राज्यातील शाळा-महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी देण्यात आली नाही.

कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल अमेरिकेला मागे टाकत भारताने कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत जगात अव्वल स्थान मिळवले आहे. 43 लाखांपेक्षा अधिक लोकांनी देशात कोरोनाचं युद्ध जिंकलं आहे. जगभरातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येपैकी 19 टक्के संख्या ही भारतातील आहे. Worldometers नुसार, भारतानंतर कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत 18.70 टक्क्यांसह अमेरिकेचा क्रमांक लागतो. तर तिसऱ्या स्थानी ब्राझील असून त्यांच्या रिकव्हरी रेट हा 16.90 टक्के आहे. त्यानंतर रशिया आणि दक्षिण अफ्रिका आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन कोटींवरकोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल तीन कोटींवर गेला असून रुग्णांची संख्या 31,239,588 वर पोहोचली आहे. तर 965,065 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. दररोज 90 हजारांहून अधिक नवे रुग्ण हे आढळून येत आहेत. मात्र याच दरम्यान अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

आणखी बातम्या...

- काँग्रेसचे राजीव सातव यांच्यासह राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचे निलंबन 

- Bhiwandi building collapse : भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

- India Chine Faceoff : एलएसीवर तणाव सुरूच, दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची आज बैठक    

- आजचे राशीभविष्य - २१ सप्टेंबर २०२० - वृश्चिकसाठी लाभाचा अन् मकरसाठी आनंदाचा दिवस    

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश