दुचाकी घसरून युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 00:02 IST2016-03-18T23:44:58+5:302016-03-19T00:02:24+5:30
नाशिक : जेलरोड येथून दसकच्या दिशेने मोटारसायकलवर जातांना दुचाकी घसरल्याने भीमनगर येथील युवक परेश हेमंत बर्वे (२१) हा युवक जागीच ठार झाला. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. तर मोटारसायकलवरील दुसरा युवक सुरज किरण दोंदे (१९) रा. भीमनगर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. बर्वे याच्या निधनाने भीमनगर परिसरात शोककळा पसरली.