थंडीतही हवामान कोरडे!
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:37+5:302014-12-20T22:27:37+5:30
थंडीतही हवामान कोरडे!

थंडीतही हवामान कोरडे!
थ डीतही हवामान कोरडे!मुंबई : राज्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडली असतानाच राज्यातील हवामान मात्र कोरडे नोंदविण्यात येत आहे. गेल्या चोविस तासांत गोव्यासह संपुर्ण राज्यातील हवामान कोरडे नोंदविण्यात आले असून, पुढील तासांसाठीदेखील गोव्यासह राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणार्या वार्याचा जोर कायम आहे. परिणामी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचा किमान तापमानाचा पारा खाली घसरला असून, शनिवारी विदर्भात थंडीची लाट आली होती. मात्र चोविस तासांतच विदर्भातील थंडीची लाट काहीशी ओसरली आहे. परंतू तरिही किमान तापमान स्थिर असल्याने थंडीचा जोर कायम आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागात किमान तापमान सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाडयाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. तर कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.दरम्यान, मुंबईच्या किमान तापमानाचा पारा शनिवारीदेखील १९ अंश नोंदविण्यात आला असून, येथील थंड वातावरणामुळे मुंबईकरांना गारवा चांगलाच जाणवू लागला आहे. शिवाय पुढील चोविस तासांत शहरात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, किमान तापमान काही अंशी खाली घसरेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)......................प्रमुख शहरांचे किमान तापमानयवतमाळ ७.८वर्धा ९.५नागपूर ८.५चंद्रपूर १०बुलढाणा १०.६अकोला ९.४नांदेड ८परभणी १०.६उस्मानाबाद १०.३नाशिक १०.४मालेगाव १०जळगाव १०अहमदनगर ९.८......................