पंजाब, हरयाणामध्ये थंडीच्या लाटेची तीव्रता कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 02:28 AM2020-01-02T02:28:42+5:302020-01-02T02:28:55+5:30

दिल्लीमध्ये तापमान आणखी घसरले; काश्मीरमध्ये सहा व सात तारखेला जोरदार हिमवृष्टीची शक्यता

Cold wave prevails in Punjab, Haryana | पंजाब, हरयाणामध्ये थंडीच्या लाटेची तीव्रता कायम

पंजाब, हरयाणामध्ये थंडीच्या लाटेची तीव्रता कायम

googlenewsNext

नवी दिल्ली : पंजाब, हरयाणामध्ये थंडीच्या लाटेची तीव्रता कायम असून, दोन्ही पंजाबमधील लुधियाना येथे बुधवारी सर्वाधिक थंडी होती. दिल्लीमध्ये तापमान २.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. काश्मीरमध्येही थंडीचा कडाका आणखी वाढला असून, तेथे हिमवृष्टी सुरू झाली आहे.

पंजाब, हरयाणात पावसाची शक्यता
हरयाणातील अंबाला, हिसार, कर्नाल येथे बुधवारी अनुक्रमे २.४, १ व ०.६ अंश सेल्सिअस तापमान होते. लुधियाना येथे ०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमृतसर, पतियाळा येथे अनुक्रमे २.४, १.६ अंश सेल्सिअस तर पठाणकोट, आदमपूर, हलवारा, भटिंडा, फरिदकोट, गुरुदासपूर येथे ०.८, ०.४, ०.९, १.२, ३.१ अंश सेल्सिअस तापमान होते.

हरयाणामध्ये अंबाला, हिसार, कर्नालमध्ये थंडीचा कडाका वाढला असून, तेथे अनुक्रमे २.४, १, ०.६ अंश सेल्सिअस तर पंंजाब, हरयाणाची संयुक्त राजधानी चंदीगडमध्ये ३.५ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. अमृतसर, भटिंडा, हलवारा, फरिदकोट, भिवानी, सिरसा, हिसार येथे दाट धुक्यामुळे धूसर दिसत असल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. पंजाब व हरयाणामध्ये गुरुवारी व शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

लडाखमध्येही प्रचंड थंडी
काश्मीर, लडाखमध्ये बुधवारी थंडीचा कडाका पुन्हा वाढला असून, तेथे हिमवृष्टी सुरू झाली आहे. काश्मीरच्या पठारी भागात कमी प्रमाणात व डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होत आहे. येत्या ६ व ७ जानेवारीला काश्मीरमध्ये पुन्हा जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.

श्रीनगरमध्ये मंगळवारी रात्री उणे ४.४ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. काश्मीरमध्ये सर्वाधिक थंड तापमान गुलमर्गमध्ये (उणे ११.० अंश सेल्सिअस) होते.

पहलगाम, काझीगुंड, कोकेरनाग, कुपवारा येथे मंगळवारी रात्री अनुक्रमे उणे ६.९, उणे ६.५, उणे ४.८, उणे ४.३ अंश सेल्सिअस तर लडाखमधील लेह शहरात उणे १३.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. काश्मीरमध्ये श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील बनिहाल-रामबन परिसरात दरडी कोसळण्याची शक्यता आहे.

रेल्वेगाड्यांना उशीर
दिल्लीतील तापमानाचा पारा २.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याने तेथील थंडीच्या प्रमाणात आणखी वाढ झाली आहे. हवामानाच्या बदललेल्या स्थितीचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
दिल्लीत येणाऱ्या व जाणाºया २९ रेल्वेगाड्या नियोजित वेळेपेक्षा अडीच तास विलंबाने धावत होत्या. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक सुरळीत सुरू आहे.
दिल्लीतील हवेच्या दर्जाची पातळी ४३३ इतकी नोंदविण्यात आली. ती गेल्या काही दिवसांपेक्षा आणखी खालावली आहे.
या शहरात अनेक ठिकाणी सकाळी दाट धुके होते.

Web Title: Cold wave prevails in Punjab, Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.