सिमला गारठले उणे २ अंश सेल्सिअस उत्तरभारत : हिमवृष्टी आणि पावसामुळे थंडीची लाट कायम

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:14+5:302015-01-23T23:06:14+5:30

नवी दिल्ली : उत्तर भारतातील तापमानात किंचित वाढ होत असतानाच पुन्हा थंडीची लाट आली आहे. अनेक ठिकाणी पावसाने फटका दिला. हिमाचल प्रदेशात ताज्या हिमवृष्टीने पुन्हा गारठा वाढला असून सिमल्यात गुरुवारी रात्री या हंगामातील सर्वात कमी उणे २ तापमानाची नोंद झाली.

Cold wave over minus 2 degrees Celsius: cold wave continues due to snow and rain | सिमला गारठले उणे २ अंश सेल्सिअस उत्तरभारत : हिमवृष्टी आणि पावसामुळे थंडीची लाट कायम

सिमला गारठले उणे २ अंश सेल्सिअस उत्तरभारत : हिमवृष्टी आणि पावसामुळे थंडीची लाट कायम

ी दिल्ली : उत्तर भारतातील तापमानात किंचित वाढ होत असतानाच पुन्हा थंडीची लाट आली आहे. अनेक ठिकाणी पावसाने फटका दिला. हिमाचल प्रदेशात ताज्या हिमवृष्टीने पुन्हा गारठा वाढला असून सिमल्यात गुरुवारी रात्री या हंगामातील सर्वात कमी उणे २ तापमानाची नोंद झाली.
सकाळी दाट धुक्यांमुळे उत्तर भारतातील प्रमुख शहरांमधील रेल्वे आणि विमानसेवा विस्कळीत झाली. राजस्थानमध्ये दाट धुक्यामुळे झालेल्या अपघातात नऊ जण ठार झाले. दिल्लीचे तापमान सहा अंशांनी वाढल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राजधानीत शुक्रवारी वातावरण ढगाळलेले होते. ६.५ मि.मि. पावसाची नोंदही झाली. जम्मू-काश्मीरही गारठले असून श्रीनगरमध्ये किमान ०.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
--------------------
राजस्थानात अनेक ठिकाणी पाऊस
राजस्थानमध्ये शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. दाट धुक्यामुळे अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच पावसाची भर पडली. त्यामुळे गारठा आणखी वाढला आहे.

Web Title: Cold wave over minus 2 degrees Celsius: cold wave continues due to snow and rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.