उत्तर भारतात थंडीची लाट कुल्लू-मनालीला जाऊ नका : पर्यटकांना सूचना

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:42+5:302014-12-18T00:40:42+5:30

नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारत थंडीच्या लाटेखाली आला असून, हिमाचल प्रदेशच्या बहुतांश भागात तापमान झपाट्याने घसरू लागले आहे. दिल्लीत पाऊस पडला नसला तरी बोचऱ्या वाऱ्यांमुळे हुडहुडी भरली आहे. या ठिकाणी ९.२ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. कुल्लू-मनालीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून वीज आणि पाणीपुरवठा खंडित असल्याचे पाहता पर्यटकांनी या भागाला भेट देऊ नये, अशी सूचना हिमाचल सरकारने जारी केली आहे.

Cold wave in North India should not go to Kullu-Manali: Instructions to tourists | उत्तर भारतात थंडीची लाट कुल्लू-मनालीला जाऊ नका : पर्यटकांना सूचना

उत्तर भारतात थंडीची लाट कुल्लू-मनालीला जाऊ नका : पर्यटकांना सूचना

ी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारत थंडीच्या लाटेखाली आला असून, हिमाचल प्रदेशच्या बहुतांश भागात तापमान झपाट्याने घसरू लागले आहे. दिल्लीत पाऊस पडला नसला तरी बोचऱ्या वाऱ्यांमुळे हुडहुडी भरली आहे. या ठिकाणी ९.२ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. कुल्लू-मनालीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून वीज आणि पाणीपुरवठा खंडित असल्याचे पाहता पर्यटकांनी या भागाला भेट देऊ नये, अशी सूचना हिमाचल सरकारने जारी केली आहे.
कुल्लू-मनालीला जाणारे रस्ते बर्फाच्छादित असून, वाहने खोळंबल्यामुळे ३३२ रस्ते बंद आहेत. केयलाँग आणि स्पिती येथे सर्वात कमी उणे १२.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अतिउंच अशा आदिवासी भागात तापमान गोठणबिंदूखाली १५ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे.

Web Title: Cold wave in North India should not go to Kullu-Manali: Instructions to tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.