थंडीचा प्रकोप राजस्थानात एकाचा बळी

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:23+5:302014-12-18T22:39:23+5:30

नवी दिल्ली : पंजाब, हरियाणा आणि राजस्थानात गोठवून टाकणाऱ्या थंडीने जनजीवन प्रभावित झाले असून राजस्थानात थंडीने एक बळी घेतला आहे़

The cold season is the victim of one in Rajasthan | थंडीचा प्रकोप राजस्थानात एकाचा बळी

थंडीचा प्रकोप राजस्थानात एकाचा बळी

ी दिल्ली : पंजाब, हरियाणा आणि राजस्थानात गोठवून टाकणाऱ्या थंडीने जनजीवन प्रभावित झाले असून राजस्थानात थंडीने एक बळी घेतला आहे़
राजस्थानात थंडीचा कडाका वाढला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे़ जयपूरच्या जलपुरा भागात गुरुवारी सकाळी एका ४० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला़ या व्यक्तीचा मृत्यू थंडीने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले जयपूरमध्ये काल बुधवारी या हिवाळ्यातील सर्वाधिक कमी ५़४ अंश से़ तापमान नोंदवले गेले़
उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या राज्यातील राजस्थानलगतच्या सीमा भागांवरील दाट धुक्यांमुळे अनेक रेल्वेगाड्यांचा खोळंबा झाला़
पंजाब आणि हरियाणात आज दुसऱ्या दिवशीही गोठवून टाकणाऱ्या थंडीसोबतच दाट धुक्यांमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली़ अमृतसर येथे सर्वाधिक कमी २़४ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली़ हरियाणातील अनेक भागात थंडी आणि दाट धुक्यांमुळे जनजीवन प्रभावित झाले़ येत्या दोन दिवस थंडीची लाट अशीच कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले़

Web Title: The cold season is the victim of one in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.