शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 14:12 IST

सरकारी रुग्णालयांच्या डॉक्टरांनी सर्दी, डोकेदुखी किंवा सौम्य ताप अशा तक्रारी घेऊन आलेल्या रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनवर कॅन्सर, किडनी फेल्यूअर आणि हृदयरोग यासारख्या गंभीर आजारांसाठी महागडी औषधे लिहिली असल्याचा आरोप आहे.

राजस्थान सरकारी आरोग्य योजना (RGHS) अंतर्गत रुग्णांच्या आरोग्याशी, जीवाशी खेळ गेला जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलवर जिल्ह्यातील लेटेस्ट रिपोर्ट धडकी भरवणारा आहे. सरकारी रुग्णालयांच्या डॉक्टरांनी सर्दी, डोकेदुखी किंवा सौम्य ताप अशा तक्रारी घेऊन आलेल्या रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनवर कॅन्सर, किडनी फेल्यूअर आणि हृदयरोग यासारख्या गंभीर आजारांसाठी महागडी औषधं लिहिली असल्याचा आरोप आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे गर्भवती महिलांना वंध्यत्व दूर करणारी औषधं देखील देण्यात आल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात, सरकारी डॉक्टर, मेडिकल स्टोअर ऑपरेटर आणि लॅब मालक यांच्यात कमिशन गेमचा खोल संबंध असल्याचे पुरावे आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या चौकशीत गडबड झाल्याचं उघड झाल्यानंतर अलवर जिल्ह्यातील ११ डॉक्टर आणि अनेक मेडिकल स्टोअर ऑपरेटरना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राजगड सामुदायिक आरोग्य केंद्राच्या सर्व डॉक्टरांवर कारवाई केली जात आहे. 

एका डॉक्टरने सामान्य, निरोगी महिलांच्या प्रिस्क्रिप्शनवर वंध्यत्वाचं औषध लिहिलं, तर सौम्य ताप असलेल्या रुग्णाच्या प्रिस्क्रिप्शनवर कॅन्सर, किडनी आणि हृदयाशी संबंधित औषधं दिली जात होती. मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (CMHO) डॉ. योगेंद्र शर्मा यांनी माहिती दिली की, RGHS योजनेत बऱ्याच काळापासून गडबड होत असल्याच्या तक्रारी येत होत्या, त्यानंतर सखोल चौकशी मोहीम राबविण्यात आली. सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक तथ्य समोर आली आहेत.

तपासात एक भयंकर गोष्ट देखील समोर आली आहे की अनेक डॉक्टरांनी रुग्णाला न पाहताही प्रिस्क्रिप्शन लिहिलं. काही प्रकरणांमध्ये रुग्णांना न कळवता त्यांच्या नावाने औषधं खरेदी केली गेली आणि त्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये बनावट प्रिस्क्रिप्शन  आणि मेडिकल स्टोअर चालकांच्या संगनमताचे ठोस पुरावे समोर आले आहेत. या संशयास्पद नेटवर्कमध्ये शिवाजी पार्क प्राथमिक आरोग्य केंद्र, पहाडगंज प्राथमिक आरोग्य केंद्र आणि राजगड रुग्णालय यासारख्या अनेक सरकारी रुग्णालयांचा सहभाग असल्याचं आढळून आलं आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल