कोका कोलाचे सलमानला ' थम्स डाऊन'?
By Admin | Updated: October 20, 2016 10:15 IST2016-10-19T21:10:33+5:302016-10-20T10:15:05+5:30
२०१२ मध्ये कोका कोलाने सलमान खानला सदिच्छा दूत (ब्रँड अॅम्बेसेडर) म्हणून नियुक्ती होती. माध्यमांच्या वृत्तानुसार गेल्या महिन्यात सलमान खानचा कोका कोला बरोबरचा करर संपला आहे.

कोका कोलाचे सलमानला ' थम्स डाऊन'?
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - सुप्रसिद्ध शीतपेय 'कोका कोला'चे उत्पादन करणारी हिंदुस्थान कोका कोलाने चार वर्षानंतर सुपरस्टार दबंग सलमान खान बरोबरचा आपला करार मोडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१२ मध्ये कोका कोलाने सलमान खानला सदिच्छा दूत (ब्रँड अॅम्बेसेडर) म्हणून नियुक्ती केली होती. माध्यमांच्या वृत्तानुसार गेल्या महिन्यात सलमान खानचा कोका कोला बरोबरचा करार संपला आहे. कंपनीने यापुढे सलमान खान बरोबरचा करार वाढवण्यास नकार दर्शवला आहे.
सलमानचे वाढते वय पाहून कंपनीने त्याच्या ऐवजी नव्या पिढीतील रणवीर सिंहला घेण्याची तयारी दर्शवली आहे. सलमान कोका कोलाकडून प्रतिवर्षी ५ करोड रुपये मानधन घेत होता. २०१२ मध्ये दबंग सलमानने खिलाडी अक्षयचा पत्ता कट करत ब्रँड अॅम्बेसेडर झाला होता. कोका कोलाने घतलेल्या या निर्णयाला आता थम्सअप - सलमान खान आऊट, रणवीर सिंह इन असेच म्हणावे लागेल.