तटरक्षक दलाचे टेहळणी विमान तीन कर्मचा-यांसह बेपत्ता

By Admin | Updated: June 10, 2015 00:05 IST2015-06-10T00:05:05+5:302015-06-10T00:05:05+5:30

तटरक्षक दलाचे डॉर्नियर टेहळणी विमान सोमवारी रात्री अचानक बेपत्ता झाल्यामुळे विमानात असलेल्या तीन कर्मचाऱ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

Coast Guard squad seized with three employees | तटरक्षक दलाचे टेहळणी विमान तीन कर्मचा-यांसह बेपत्ता

तटरक्षक दलाचे टेहळणी विमान तीन कर्मचा-यांसह बेपत्ता

चेन्नई : तटरक्षक दलाचे डॉर्नियर टेहळणी विमान सोमवारी रात्री अचानक बेपत्ता झाल्यामुळे विमानात असलेल्या तीन कर्मचाऱ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. या विमानाचा शोध घेण्यासाठी विमाने, हेलिकॉप्टर्स आणि जहाजांची सेवा घेण्यात आली आहे.
गेल्या वर्षी तटरक्षक दलात सामील करण्यात आलेले सीजी-७९१ हे विमान तिरुचिरापल्ली येथील विमानतळ अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून होते; परंतु चिदंबरमपासून अंदाजे १६ समुद्री मैल अंतरावर कुड्डालोर आणि कराईकालच्या दरम्यान विमानाचा संपर्क तुटला आणि त्यानंतर विमान बेपत्ता झाले.
बेपत्ता होण्याच्या काही क्षणापूर्वी वैमानिकाने वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केल्याचे हा अधिकारी म्हणाला. डेप्युटी कमांडर विद्यासागर (वैमानिक), डेप्युटी कमांडर एम.के. सोनी (सह-वैमानिक) आणि नेव्हीगेटर डेप्युटी कमांडर सुभाष सुरेश अशी विमानात असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
सोमवारी रात्री ९.२३ वाजेनंतर या विमानाशी संपर्क होऊ शकला नाही. हे विमान १०००० फुटापेक्षा अधिक उंचीवरून उडू शकत नाही आणि ते कमी उंचीवरून उडत टेहळणी करण्यासाठी तयार केलेले आहे. या विमानाने सायंकाळी ५.३० वाजता नेहमीप्रमाणे चेन्नईहून उड्डाण केले होते आणि विमानातील सर्व तीनही कर्मचारी अतिशय अनुभवी होते, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.
विमान बेपत्ता झाल्याचे कळताच त्याचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी तटरक्षक दलाची पाच आणि नौदलाची चार जहाजे आणि विमानांसोबतच हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Coast Guard squad seized with three employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.