कोलमाईन्स नेत्याचे खूनप्रकरण

By Admin | Updated: July 4, 2015 00:05 IST2015-07-04T00:05:58+5:302015-07-04T00:05:58+5:30

कोलमाईन्स कामगार नेत्याच्या

Coalination leader murder | कोलमाईन्स नेत्याचे खूनप्रकरण

कोलमाईन्स नेत्याचे खूनप्रकरण

लमाईन्स कामगार नेत्याच्या
खुनातील दोघांना नाकारला जामीन

नागपूर : सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी येथे झालेल्या कोलमाईन्स वर्कस् क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष चिरकुट गोविंदराव मोजे यांच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
फिरोज ताजमोहम्मद शेख (४०) आणि दिलीप रतनलाल मदने (४२) दोन्ही रा. पाटणसावंगी, अशी आरोपींची नावे आहेत.
प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, पाटणसावंगी येथे महामार्गाला लागून चिरकुट मोजे यांच्या पत्नीच्या नावे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. आरोपींपैकी फिरोज याने मोजे यांना त्यांच्या कॉम्प्लेक्समधील एक दुकान विकत मागितले होते. परंतु त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. परिणामी फिरोजने मोजे यांच्या खुनाचा कट रचला होता. ८ मे २०१५ रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास चिरकुट मोजे हे आपल्या राजहंस लॉनसमोरील नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करीत असताना फिरोज, दिलीप आणि अन्य दोन जणांनी त्यांच्यावर तीक्ष्ण व धारदार शस्त्रांनी अनेक वार करून त्यांचा घटनास्थळीच खून केला होता. सावनेर पोलिसांनी भादंविच्या ३०२, १२० (ब), ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून दुसऱ्या दिवशी फिरोज आणि दिलीप यांना अटक केली होती. दोन आरोपी अद्यापही गवसले नाहीत.
फिरोज आणि दिलीप यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता तो फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रशांत साखरे यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ हे आहेत.

Web Title: Coalination leader murder