कोळसा, 2-जी घोटाळा हे काँग्रेसविरोधी षड्यंत्र
By Admin | Updated: November 15, 2014 02:02 IST2014-11-15T02:02:06+5:302014-11-15T02:02:06+5:30
2-जी घोटाळा आणि कोळसा घोटाळा झालाच नाही. हे भाजपाने काँग्रेसच्या विरोधात रचलेले एक षड्यंत्र होते आणि या षड्यंत्रचा पर्दाफाश माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद लवकरच करणार आहेत.

कोळसा, 2-जी घोटाळा हे काँग्रेसविरोधी षड्यंत्र
नवी दिल्ली : 2-जी घोटाळा आणि कोळसा घोटाळा झालाच नाही. हे भाजपाने काँग्रेसच्या विरोधात रचलेले एक षड्यंत्र होते आणि या षड्यंत्रचा पर्दाफाश माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद लवकरच करणार आहेत. खुर्शिद हे हल्ली एक पुस्तक लिहित आहेत. ‘अदर साईड ऑफ माऊंटेन’ हे त्या पुस्तकाचे नाव. या पुस्तकात नवा राजकीय भूकंप निर्माण करणारे अनेक खुलासे केले जाण्याची शक्यता आहे.
संपुआ सरकारला बदनाम करण्यासाठी कशाप्रकारे घोटाळे असल्याचे सांगून 2-जी आणि कोळसा घोटाळ्याचा कट रचला, कोण केव्हा आणि कुणाला भेटला, कोण काय बोलले, 2-जी व कोळसा खाणपट्टे वाटपाला घोटाळा ठरविण्यासाठी कशाप्रकारे षड्यंत्र रचण्यात आले, याबाबतचे वास्तव खुर्शिद हे पुराव्यासह उघड करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रंनी दिली.
संपुआ सरकारला भ्रष्टाचाराच्या नावावर घेरण्याचा प्रय} करणा:या नेत्यांचे पितळ या पुस्तकामुळे उघडे होईल, असा दावा खुर्शिद यांनी केला आहे. या पुस्तकात समाज सेवक अण्णा हजारे यांचा खरा चेहराही उघड करण्यात आला आहे. या पुस्तकात खुर्शिद यांनी म्हटल्याप्रमाणो ते अण्णांना भेटायला गेले तेव्हा किरण बेदीही तेथे होत्या. अण्णा काँग्रेससाठी निवडणूक प्रचार करण्यास सशर्त तयार झाले होते. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्याला या आशयाचे पत्र लिहावे ही त्यांची अट होती. या भेटीबाबत मीडियाने विचारले तर काय सांगणार, असे खुर्शिद यांनी अण्णांना विचारले तेव्हा ‘राष्ट्रहितासाठी खोटे बोलण्यात गैर नाही, असा तर्क देत अण्णांनी त्यांना खोटे बोलण्यास सांगितले होते. खुर्शिद दिल्लीत परतले आणि त्यांनी मनमोहनसिंग यांना ही माहिती दिली. त्यावेळी मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान कार्यालयातर्फे अण्णांना पत्र पाठवावे असे ठरले. पण पंतप्रधान कार्यालयाने पत्र पाठविताना ते अण्णांच्या पत्त्याऐवजी अरविंद केजरीवाल यांच्या पत्त्यावर पाठविले. त्यावेळी अण्णा केजरीवाल यांच्यासोबत असल्याने अण्णा टीमनेच पंतप्रधान कार्यालयाला केजरीवालांचा हा पत्ता दिला होता. (प्रतिनिधी)