शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Coal Shortage: देशावर भीषण वीज संकट, गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक; रेल्वे, कोळसा आणि ऊर्जामंत्री उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 14:16 IST

Coal Shortage: तीव्र उष्णतेमुळे देशभरात वीजेचा मागणी वाढली आहे, पण कोळशाच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांत वीजपुरवठा खंडित होत आहे.

नवी दिल्ली: सध्या देशात भीषण वीज संकट उद्धवले आहे. यामुळे देशभरात घबराटीचे वातावरण आहे. वीज कपातीमुळे अनेकजण चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या निवासस्थनी महत्वाची बैठक बोलावली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ऊर्जा मंत्री आरके सिंह, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी हेदेखील या बैठकीत उपस्थित आहेत. 

अनेक प्रवासी गाड्या रद्दतीव्र उष्णतेमुळे वीजेचा मागणी वाढली आहे, पण कोळशाच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांत वीजपुरवठा खंडित होत आहे. औष्णिक प्रकल्पांमध्ये कोळशाच्या तुटवड्यासाठी विरोधी पक्षांनी केंद्रावर आरोप केले आहेत. वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर कोळशाची वाहतूक वाढवण्यासाठी रेल्वेने आतापर्यंत सुमारे 50 प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि झारखंड या कोळसा उत्पादक राज्यांमधून ये-जा करणाऱ्या लोकांची गैरसोय होत आहे.

विजेच्या मागणीत वाढगेल्या सोमवारी विजेचा तुटवडा 5.24 GW होता, तो गुरुवारी 10.77 GW झाला. पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन (POSOCO) च्या ताज्या आकडेवारीनुसार, रविवारी पीक पॉवर तूट फक्त 2.64 GW होती, जी सोमवारी 5.24 GW, मंगळवारी 8.22 GW, बुधवारी 10.29 GW आणि गुरुवारी 10.77 GW झाली. देशभरात कडाक्याच्या उन्हात गेल्या आठवड्यात तीन वेळा वीजपुरवठा विक्रमी पातळीवर पोहोचला. मंगळवारी सर्वाधिक वीज मागणी विक्रमी 201.65 GW वर पोहोचली. तर, गुरुवारी विजेची कमाल मागणी 204.65 GW च्या विक्रमी उच्चांकावर होती आणि शुक्रवारी 207.11 GW च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहCoal Shortageकोळसा संकट