कोळसा खाणपट्टे; अॅटर्नी जनरलचे मत मागवले
By Admin | Updated: October 6, 2014 23:26 IST2014-10-06T23:26:43+5:302014-10-06T23:26:43+5:30
कोळसा खाणपट्टे रद्द करण्यात आल्यानंतर त्याबाबत अध्यादेश जारी करण्याच्या संदर्भात केंद्र सरकारने अॅटर्नी जनरल यांचे मत मागितले आहे

कोळसा खाणपट्टे; अॅटर्नी जनरलचे मत मागवले
नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे रद्द करण्यात आल्यानंतर त्याबाबत अध्यादेश जारी करण्याच्या संदर्भात केंद्र सरकारने अॅटर्नी जनरल यांचे मत मागितले आहे. असा अध्यादेश जारी करण्याची आवश्यकता आहे काय, अशी विचारणा सरकारने अॅटर्नी जनरल यांना केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळसा खाणींच्या संदर्भात बँक गॅरंटी आणि कंपन्यांनी विकत घेतलेल्या कोळसा खाणपट्ट्यांचे मालकी हक्क जप्त करण्यासह अन्य अनेक मुद्यांचा सरकारला निपटारा करायचा आहे.
कोळसा मंत्रालयाने कोळसा कंपन्यांची बँक गॅरंटी जप्त करण्याच्या आणि खाणपट्टे रद्द करण्यात आल्याच्या संदर्भात अॅटर्नी जनरलचे मत मागितले आहे. (वृत्तसंस्था)