शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVaccine: कोरोना लसीसाठी 'या' अ‍ॅपवर रजिस्टर करावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 11:32 IST

Corona Virus Vaccination Co-WIN App: को-विन अ‍ॅपमध्ये लसीकरण प्रक्रियेपासून प्रशासनाचे काम, लसीकरण कर्मचाऱ्यांची तसेच ज्यांना लस द्यायची आहे त्यांची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये सेल्फ रजिस्ट्रेशनचाही पर्याय असणार आहे.

कोरोना व्हायरसची लस लवकरच भारतात दिली जाणार आहे. केंद्राची तातडीने, आपत्कालीन परवानगी मिळविण्यासाठी तीन कंपन्यांनी अर्ज केले आहेत. ब्रिटन, अमेरिका, बहारीन, रशियामध्ये लसीकरणास सुरुवात झाली आहे. यामुळे भारतातही लवकरच लसीकरणाची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. आता ही लस कशी दिली जाणार, कोण कोण लाभार्थी ठरणार, टप्पे, वितरण आदी प्लॅनिंग सुरु असताना अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. अशावेळी सरकारने लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक अ‍ॅप विकसित केले आहे, जे लसीकरणावर नजर ठेवणार आहे. 

या अ‍ॅपचे नाव आहे Co-WIN. हे Co-WIN App मोफत डाऊनलोड करता येणार आहे. मात्र, सध्या हे अ‍ॅप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध नाहीय. यामुळे डाऊनलोड करता येणार नाहीय. अशाप्रकारचे अ‍ॅप कुठेही आढळल्यास ते डाऊनलोड करू नका. ते फेक असू शकते शिवाय तुमचा डेटा हॅकर्सना मिळू शकतो. केंद्र सरकार या अ‍ॅपच्या लाँचची अधिकृत घोषणा करणार आहे. या अ‍ॅपबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. 

को-विन अ‍ॅपमध्ये लसीकरण प्रक्रियेपासून प्रशासनाचे काम, लसीकरण कर्मचाऱ्यांची तसेच ज्यांना लस द्यायची आहे त्यांची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये सेल्फ रजिस्ट्रेशनचाही पर्याय असणार आहे. ग्राम पंचायत सरपंच देखील त्याच्या गावातील लोकांच्या लसीकरणासाठी या अ‍ॅपद्वारे अर्ज करू शकणार आहे. 

भारतात लसीकरण तीन टप्प्यांमध्ये केले जाईल. आरोग्य कर्मचारी, आपत्कालीन सेवा कर्मचारी असे दोन टप्पे आहेत. याची माहिती गोळा करण्याचे काम राज्य सरकारांना देण्य़ात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात कोरोना लस ही गंभीर आजारांशी लढणाऱ्या लोकांना दिले जाणार आहे. या सर्वांचे Co-WIN अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन होणार आहे. 

कसे काम करेल? को विन अ‍ॅप पाच टप्प्यांमध्ये विभागले गेले आहे. यामध्ये प्रशासनिक मॉड्यूल, रजिस्ट्रेशन मॉड्यूल, लसीकरण, लाभ स्वीकृती मॉड्यूल, रिपोर्ट अशी पाच मॉड्यूल आहेत. रिपोर्टद्वारे लाभार्थीला आणि देणाऱ्यांना नोटिफिकेशन पाठविले जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याgoogleगुगल